दगडाने तोंड ठेचलेला मृतदेह मलकापुरात आढळला!

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दगडाने तोंड ठेचलेला ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने मलकापूरमध्ये खळबळ उडाली आहे. आज, २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास शहरातील लायब्ररी पटांगणात हिराबाई संचेती कन्या शाळेजवळ हा मृतदेह दिसून आला.स्थानिक नागरिकांनी मृतदेहाची माहिती पोलिसांना दिली. मलकापूर शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रल्हाद काटकर घटनास्थळी पोहोचले. अनोळखी व्यक्तीचा दगडाने ठेचून खून झाल्याचा …
 
दगडाने तोंड ठेचलेला मृतदेह मलकापुरात आढळला!

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दगडाने तोंड ठेचलेला ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळल्‍याने मलकापूरमध्ये खळबळ उडाली आहे. आज, २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास शहरातील लायब्ररी पटांगणात हिराबाई संचेती कन्या शाळेजवळ हा मृतदेह दिसून आला.
स्थानिक नागरिकांनी मृतदेहाची माहिती पोलिसांना दिली. मलकापूर शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रल्हाद काटकर घटनास्थळी पोहोचले. अनोळखी व्यक्तीचा दगडाने ठेचून खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या व्यक्तीजवळ एक चिठ्ठी आढळली असून, त्यात गोपाल असे लिहिलेले असून, एक मोबाइल नंबरही लिहिलेला आहे. मात्र मोबाइल नंबर बंद आहे. वृत्त लिहीपर्यंत मृतदेहाची ओळख पटलेली नव्हती.