त्‍याला हवी होती मोटारसायकल… पत्‍नीला पैशांसाठी छळले, दुसरे लग्‍नही केले!; पत्‍नीची पोलिसांत धाव

लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मोटारसायकल घेण्यासाठी माहेरवरून ५० हजार रुपये घेऊन ये, असे म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी बिबी पोलिसांनी तिच्या पतीसह सासरच्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सौ. निर्मला संदीप खांडेभराड (२७, रा. टेंभुर्णी ता. जाफराबाद जि. जालना, ह. मु. खळेगाव ता. लोणार) हिने या प्रकरणात तक्रार दिली. संदीप रंगनाथ …
 

लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मोटारसायकल घेण्यासाठी माहेरवरून ५० हजार रुपये घेऊन ये, असे म्‍हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी बिबी पोलिसांनी तिच्या पतीसह सासरच्या आठ जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

सौ. निर्मला संदीप खांडेभराड (२७, रा. टेंभुर्णी ता. जाफराबाद जि. जालना, ह. मु. खळेगाव ता. लोणार) हिने या प्रकरणात तक्रार दिली. संदीप रंगनाथ खांडेभराड (पती), सिंधूबाई रंगनाथ खांडेभराड (सासू), रंगनाथ नारायण खांडेभराड (सासरा), संतोष रंगनाथ खांडेभराड (दीर), रुख्मिनाबाई संतोष खांडेभराड (जाऊ, सर्व रा. टेभुर्णी), सुनिता दत्ता घायाळ (नणंद), दत्ता उमाजी घायाळ (नंदाई, दोन्ही रा. लोणगाव ता. भोकरदन), अलका विजय राऊत (रा. मेहकर) अशी गुन्‍हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. निर्मला आणि संदीप यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. सुरुवातीचे आठ वर्षे सासरच्यांनी निर्मलाला चांगले वागवले. मात्र नंतर या ना त्या कारणावरून त्रास देणे सुरू केले. माहेरवरून मोटारसायकल आणण्यासाठी ५० हजार रुपये घेऊन असे म्‍हणून तिला शिविगाळ व मारहाण केली जाऊ लागली. एवढ्यावरच न थांबता पतीने दुसऱ्या महिलेसोबत लग्‍न केल्याचे तक्रारीत म्‍हटले आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक श्री. राठोड करत आहेत.