तलवारीने केक कापणे, नृत्‍य करणे पडले महागात!; तरुणाला पकडले, 5 जणांविरुद्ध खामगावमध्ये गुन्‍हा दाखल

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रस्त्यावर एकत्र येऊन तलवारीने केक कापणे, त्यानंतर नृत्य करणे तरुणाला चांगलेच महागात पडले. बाळापूर फैल भागातील सुदर्शन गेटजवळ आज, 3 जूनला मध्यरात्री 12 च्या सुमारास हा प्रकार घडला. खामगाव शहर पोलिसांनी तरुणाला तलवारीसह ताब्यात घेतले असून, पळून गेलेल्या चौघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. काही जण सुदर्शन गेटजवळ …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः रस्‍त्‍यावर एकत्र येऊन तलवारीने केक कापणे, त्‍यानंतर नृत्‍य करणे तरुणाला चांगलेच महागात पडले. बाळापूर फैल भागातील सुदर्शन गेटजवळ आज, 3 जूनला मध्यरात्री 12 च्‍या सुमारास हा प्रकार घडला. खामगाव शहर पोलिसांनी तरुणाला तलवारीसह ताब्‍यात घेतले असून, पळून गेलेल्या चौघांविरुद्ध गुन्‍हे दाखल केले आहेत.

काही जण सुदर्शन गेटजवळ मध्यरात्री 12 ला आपल्या मित्राचा जंगी वाढदिवस साजरा करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लगेच घटनास्‍थळी धाव घेतली. पोलिसांना पाहून वाढदिवस साजरा करणाऱ्यांनी तेथून पळ काढला. पण पोलिसांनी पाठलाग करून त्यातील रोहन संजय बामणेट (18) याला लोखंडी तलवारीसह पकडले. त्याला अन्य मित्रांची नावे विचारली असता त्‍याने मनीष हट्टेल, जय धुंदलेकर, अजिंक्य हवेलिया व अनुराग महंतो (सर्व रा. सुदर्शननगर) यांची नावे सांगितली. त्‍यामुळे या सर्वांविरुद्ध पो.काँ. गणेश गजानन इंगळे यांच्‍या तक्रारीवरून गुन्‍हा दाखल करण्यात आला. पो.काँ. गजानन जोशी, पो.काँ. दीपक राठोड, पो.काँ. अमरदीपसिंह ठाकूर यांनी यांनी ही कारवाई केली.