डेअरीवर निघालेल्या वृद्धाला वाहनाने उडवले, जागीच मृत्‍यू; बुलडाणा शहरातील चिखली रोडवरील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः डेअरीवर दूध आणण्यासाठी निघालेल्या वृद्धाला वाहनाने उडवले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना चिखली रोडवरील गोलांडे लॉन्ससमोर आज, 22 मे रोजी सकाळी सातच्या सुमारास घडली. भावराव काळुंबा गवई (७५, रा. इतापे ले आऊट, बुलडाणा) असे ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे. त्यांना धडक देऊन वाहन पसार झाले. धडक एवढी जोरात …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः डेअरीवर दूध आणण्यासाठी निघालेल्या वृद्धाला वाहनाने उडवले. यात त्‍यांचा जागीच मृत्‍यू झाला. ही घटना चिखली रोडवरील गोलांडे लॉन्ससमोर आज, 22 मे रोजी सकाळी सातच्‍या सुमारास घडली.

भावराव काळुंबा गवई (७५, रा. इतापे ले आऊट, बुलडाणा) असे ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे. त्‍यांना धडक देऊन वाहन पसार झाले. धडक एवढी जोरात होती की त्यांच्या डोक्याला मार लागून जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. तूर्त आकस्मिक मृत्‍यूची नोंद करण्यात आली असून, त्‍यांना उडवून पसार होणाऱ्या वाहनाचा शोध घेतला जात आहे.