जिल्ह्यातून दोन तरुणी गायब!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातून दोन तरुणी व एक तरुण बेपत्ता झाला आहे. तालसवाडा (ता. मलकापूर) येथील निकिता अनंता भोळे ही २२ वर्षीय तरुणी घरातून कुणाला काही न सांगता निघून गेल्याची तक्रार २१ जुलैला तिच्या घरच्यांनी केली आहे. त्यावरून एमआयडीसी मलकापूर पोलिसांनी हरवल्याची नोंद घेतली आहे. जळगाव जामोद तालुक्यातील चौभारा येथील वैष्णवी रामदास ताडे …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातून दोन तरुणी व एक तरुण बेपत्ता झाला आहे. तालसवाडा (ता. मलकापूर) येथील निकिता अनंता भोळे ही २२ वर्षीय तरुणी घरातून कुणाला काही न सांगता निघून गेल्याची तक्रार २१ जुलैला तिच्‍या घरच्यांनी केली आहे. त्‍यावरून एमआयडीसी मलकापूर पोलिसांनी हरवल्याची नोंद घेतली आहे. जळगाव जामोद तालुक्‍यातील चौभारा येथील वैष्णवी रामदास ताडे ही १९ वर्षीय तरुणी बेपत्ता झाली आहे. ती हरवल्याची तक्रार जळगाव जामोद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. संग्रामपूर तालुक्‍यातील सोनाळा येथील विशाल राजू शेंद्रे हा २८ वर्षीय तरुणीही बेपत्ता झाला असून, तो हरवल्याची तक्रार सोनाळा पोलीस ठाण्यात त्‍याच्‍या घरच्‍यांनी केली आहे.