जिल्ह्यातून दोन तरुणी, एक वृद्ध अन्‌ विवाहिता मुलासह बेपत्ता

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातून महिला, तरुणी, पुरुष बेपत्ता होण्याचे सत्र कायम आहे. दोन तरुणी, एक वृद्ध अन् एक विवाहिता आपल्या मुलासह बेपत्ता झाल्याच्या तक्रारी काल, २१ जूनला विविध पोलीस ठाण्यांत दाखल झाल्या आहेत. हिवरखेड (ता. खामगाव) येथून २५ वर्षीय विवाहिता नविता हटकर ही मुलगा प्रज्ज्वलसह घरातून निघून गेली आहे. मुलासह ती हरवल्याची तक्रार …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातून महिला, तरुणी, पुरुष बेपत्ता होण्याचे सत्र कायम आहे. दोन तरुणी, एक वृद्ध अन्‌ एक विवाहिता आपल्या मुलासह बेपत्ता झाल्‍याच्‍या तक्रारी काल, २१ जूनला विविध पोलीस ठाण्यांत दाखल झाल्या आहेत.

हिवरखेड (ता. खामगाव) येथून २५ वर्षीय विवाहिता नविता हटकर ही मुलगा प्रज्‍ज्‍वलसह घरातून निघून गेली आहे. मुलासह ती हरवल्याची तक्रार तिच्‍या घरच्‍यांनी हिवरखेड पोलिसांत दिली आहे. नांदुरा खुर्द (ता. नांदुरा) येथून १८ वर्षीय पायल नंदकिशोर हेडाऊ ही मुलगी घरातून निघून गेली आहे. ती हरवल्याची तक्रार नांदुरा पोलिसांत करण्यात आली आहे. शेगाव येथील आनंद सागर हौसिंग सोसायटीतील १८ वर्षीय अनुजा शरद उपर्वट ही तरुणी घर सोडून निघून गेली आहे. ती हरवल्याची तक्रार तिच्‍या घरच्‍यांनी शेगाव शहर पोलीस ठाण्यात केली आहे.