जावयावर सासरवाडीत अत्‍याचार!; गुप्तांगात घुसवले कारले आणि मिरची पावडर, ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल; मोताळा तालुक्यातील धक्‍कादायक घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सासरवाडीत पत्नीला घ्यायला आलेल्या जावयाचे असे स्वागत झाले की त्याला थेट पोलीस ठाण्यात धाव घ्यावी लागली. लाथाबुक्क्यांचा मार तर बसलाच पण अगदीच क्रूरतेची हद्द गाठत जावयाच्या गुप्तांगात मिरची पावडर आणि कारले घुसवल्याची धक्कादायक घटना मोताळा येथील कॉटन मार्केट परिसरात चार जुलैच्या रात्री घडली. याप्रकरणी जावई शिवाजी रघुनाथ चव्हाण (२२, रा. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सासरवाडीत पत्नीला घ्यायला आलेल्या जावयाचे असे स्वागत झाले की त्‍याला थेट पोलीस ठाण्यात धाव घ्यावी लागली. लाथाबुक्‍क्यांचा मार तर बसलाच पण अगदीच क्रूरतेची हद्द गाठत जावयाच्या गुप्तांगात मिरची पावडर आणि कारले घुसवल्याची धक्कादायक घटना मोताळा येथील कॉटन मार्केट परिसरात चार जुलैच्‍या रात्री घडली. याप्रकरणी जावई शिवाजी रघुनाथ चव्हाण (२२, रा. जुन्नर, कबारवाडी, जि. पुणे) यांनी ८ जुलै रोजी बोराखेडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जावई शिवाजीने तक्रार दिली की, ते बायकोला घेण्यासाठी चार जुलै रोजी मोताळा येथील कॉटन मार्केट येथे गेले होते. त्यावेळी त्यांचे सासरे रामराव भाऊराव पवार, साला विजय रामराव पवार, रवि रामराव पवार, राजू रामराव पवार, विकास सर्जेराव पवार, देवकाबाई, छायाबाई, नंदाबाई, रेवाबाई, कलुबाई (सर्व रा. मोताळा) व देवानंद रामभाऊ मोहिते (रा. शिवणा ता. सिल्लोड जि.औरंगाबाद) यांनी भांडण सुरू करत त्‍याचे हातपाय दोरीने बांधून अंगणात बांधले. अश्लील शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत वायरने कंबर व पाठीवर वार केले. त्यानंतर गुप्तांगात मिरचीपूड भरली व कारले घुसवले, असे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी ११ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास ठाणेदार माधव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक रोकडे करीत आहेत.