जावयाने सासऱ्याला चाकूने भोसकले!; सिंदखेडराजा तालुक्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दारू पिऊन माझ्या मुलीला का मारतोस, असे म्हणणाऱ्या सासऱ्याला जावयाने चाकूने भोसकले. ही घटना १ जुलैला वर्दडा (ता. सिंदखेड राजा) येथे घडली. यात सासरा गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात जावई आणि जावयाच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल, २ जुलैला …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः दारू पिऊन माझ्या मुलीला का मारतोस, असे म्हणणाऱ्या सासऱ्याला जावयाने चाकूने भोसकले. ही घटना १ जुलैला वर्दडा (ता. सिंदखेड राजा) येथे घडली. यात सासरा गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात जावई आणि जावयाच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल, २ जुलैला त्यांना अटक करण्यात आली. आज त्‍यांना न्यायालयात हजर केले असता ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अजय विजय पवार (२४), विजय रामसिंग पवार (४५, रा. वर्दडा, सिंदखेड राजा) अशी आरोपींची नावे आहेत.

वर्दडा येथील गणेश सुभाष भोसले यांची मुलगी कोमलचा विवाह गावातीलच अजय विजय पवारसोबत झाला आहे. अजयने १ जुलै रोजी दुपारी पत्नी कोमलला मारहाण केली. त्यामुळे कोमलचे वडील गणेश भोसले दुपारी जावई अजयच्या घरी गेले व कोमलला मारहाण करू नका, असे सांगितले. त्यानंतर सासरा व जावयात बाचाबाची झाली. अजयने त्याचे सासरे गणेश भोसले यांच्यावर चाकूने वार केले. त्यात गणेश भोसले यांच्या पोटात व मानेवर गंभीर दुखापत झाली. यात अजयचे वडील विजय पवार यांनीसुद्धा अजयला मदत केली. गंभीर जखमी अवस्थेत गणेश भोसले यांना साखरखेर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी गणेश भोसले यांची बहीण गीता सुभाष पवार (३६) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही बापलेकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.