जमिनीच्‍या हिस्से वाटणीवरून रक्‍ताचे नाते भिडले!; शेगाव तालुक्‍यातील घटना

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जमिनीच्या हिस्से वाटणीवरून कुटूंबात वाद होऊन परस्पर विरोधी दिलेल्या तक्रारीवरून शेगाव ग्रामीण पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गायगाव खुर्द (ता.शेगाव) येथील महेंद्र अशोक सोनोने (27) याने तक्रारीत म्हटले आहे, की त्याच्या वडिलांनी व दोन्ही मोठ्या भावांनी माझ्या पत्नीला 25 मे रोजी तुझ्या वडिलांनी लग्नात हुंडा …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जमिनीच्या हिस्से वाटणीवरून कुटूंबात वाद होऊन परस्पर विरोधी दिलेल्या तक्रारीवरून शेगाव ग्रामीण पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गायगाव खुर्द (ता.शेगाव) येथील महेंद्र अशोक सोनोने (27) याने तक्रारीत म्‍हटले आहे, की त्याच्या वडिलांनी व दोन्ही मोठ्या भावांनी माझ्या पत्‍नीला  25 मे रोजी तुझ्या वडिलांनी लग्नात हुंडा कमी दिला असे बोलून वाद घातला. तुझ्या वडिलांच्‍या घरून पैसे आण व शेती घे असे म्हणून वडील अशोक फकीरा सोनोने यांनी माझ्या व माझ्या पत्‍नीच्या हातावर काठी मारून जखमी केले तर माझ्या मोठ्या भावांनी मारहाण केली. पत्‍नीच्या डोक्याचे केस धरून घराबाहेर काढले. शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली, असे तक्रारीत म्‍हटले आहे. या तक्रारीवरून अशोक फकीरा सोनोने, लक्ष्मण अशोक सोनोने व नीतेश अशोक सोनोने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक सोनवणे यांनी तक्रारीत म्‍हटले आहे, की मुलगा महेंद्र अशोक सोनोने व त्याची पत्‍नी अश्विनी महेंद्र सोनोने यांनी जमिनीच्या वाटणीवरून शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास हेड कॉन्स्टेबल ज्ञानदेव ठाकरे करीत आहेत.