घरासमोरून मोटारसायकल लंपास!; चिखली तालुक्‍यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घरासमोर उभी केलेली मोटारसायकल रात्रीतून चोरट्याने गायब केली. ही घटना घानमोड (ता. चिखली) येथे १८ जुलैला सकाळी समोर आली. विलास भगवान वाघ यांनी अमडापूर पोलीस ठाणे गाठून दुचाकी चोरीची तक्रार दिली आहे. त्यांनी होंडा शाइन कंपनीची मोटारसायकल (क्र. एमएच २८ एटी ११०९) ही २०१६ साली मी विकत घेतली होती. १७ …
 
घरासमोरून मोटारसायकल लंपास!; चिखली तालुक्‍यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घरासमोर उभी केलेली मोटारसायकल रात्रीतून चोरट्याने गायब केली. ही घटना घानमोड (ता. चिखली) येथे १८ जुलैला सकाळी समोर आली.

विलास भगवान वाघ यांनी अमडापूर पोलीस ठाणे गाठून दुचाकी चोरीची तक्रार दिली आहे. त्‍यांनी होंडा शाइन कंपनीची मोटारसायकल (क्र. एमएच २८ एटी ११०९) ही २०१६ साली मी विकत घेतली होती. १७ जुलैला संध्याकाळी साडेसातला त्‍यांनी मोटरसायकल घरासमोर लाॅक करून ठेवली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सातला पाहिले असता मोटारसायकल गायब झाली होती. ३० हजार रुपये किंमतीची मोटारसायकल कुणीतरी चोरून नेल्याची तक्रार वाघ यांनी १९ जुलैला पोलीस ठाण्यात केल्याने चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.