गोठ्याला आग; शेतकऱ्याला भावावर संशय

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लागून ४५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना २४ सप्टेंबर रोजी दहीद (ता. बुलडाणा) येथे घडली होती. या प्रकरणी गोठा मालकाच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून काल, २५ सप्टेंबर रोजी ग्रामीण पोलिसांनी संशयित भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. देऊळघाट येथील रमेश विठ्ठल सबलवार यांची पळसखेड नागो शिवारात दहीद फाट्याजवळ चार …
 
गोठ्याला आग; शेतकऱ्याला भावावर संशय

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतकऱ्याच्‍या गोठ्याला आग लागून ४५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना २४ सप्टेंबर रोजी दहीद (ता. बुलडाणा) येथे घडली होती. या प्रकरणी गोठा मालकाच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून काल, २५ सप्टेंबर रोजी ग्रामीण पोलिसांनी संशयित भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

देऊळघाट येथील रमेश विठ्ठल सबलवार यांची पळसखेड नागो शिवारात दहीद फाट्याजवळ चार एकर शेती आहे. या शेतातील गोठ्याला २४ सप्टेंबरला रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली होती. या घटनेत शेतकरी रमेश सबलवार यांचे ४५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी शैलेंद्र रमेश सबलवार (रा. देऊळघाट) यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.