गळ्यावर चाकू मारून वृद्धाचा खून!; जळगाव जामाेद तालुक्‍यातील थरार, तिघांना अटक

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गळ्यावर चाकू मारून ७० वर्षीय वृद्धाचा खून करण्यात आल्याची थरारक घटना जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा महासिद्ध येथे काल, ३ ऑगस्टला रात्री नऊच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. वामन राघोजी घुले (रा. धानोरा महासिद्ध) असे खून झालेल्याचे नाव आहे. वामन घुले हे गावातील चौकात बसलेले होते. …
 

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गळ्यावर चाकू मारून ७० वर्षीय वृद्धाचा खून करण्यात आल्याची थरारक घटना जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा महासिद्ध येथे काल, ३ ऑगस्टला रात्री नऊच्‍या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

वामन राघोजी घुले (रा. धानोरा महासिद्ध) असे खून झालेल्याचे नाव आहे. वामन घुले हे गावातील चौकात बसलेले होते. तेव्‍हा ज्ञानेश्वर पांडुरंग देऊळकर (रा. धानोरा महासिद्ध) याचा त्‍यांच्यासोबत डवरणीसाठी दिलेल्या बैलजोडीच्या भाड्यावरून वाद झाला. त्‍याने घुले यांना शिविगाळ सुरू केली. यावेळी घुले यांना त्‍यांच्‍या मुलाने घरी नेले. मात्र थोड्या वेळाने पुन्हा वामन घुले चौकात आले असता ज्ञानेश्वर पांडुरंग देऊळकार, विठ्ठल देऊळकार, श्रीराम देऊळकार यांनी त्‍यांना पुन्‍हा शिविगाळ केली. विठ्ठल व श्रीरामने घुले यांना पकडून ठेवले व ज्ञानेश्वरने त्‍यांच्‍या गळ्यावर चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केले. यात वामन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या घटनेची फिर्याद सुभाष राजाराम खाडपे (४०) यांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात दिली. त्‍यावरून तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करत त्‍यांना तातडीने अटक करण्यात आली आहे. तपास पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश आडे, पोलीस कॉन्स्टेबल विकास गव्हाड करीत आहेत.