खळबळजनक… घरगुती गॅस वाहनांत भरून देणारे मलकापूरमध्ये उघडले अवैध पंप!; पोलिसांच्‍या छापेमारीत सहा जणांना पकडले!!

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घरगुती गॅस वाहनांत भरून देण्याचा गोरखधंदा काहींनी मलकापूरमध्ये सुरू केला असून, त्याचा पर्दाफाश मलकापूर शहर पोलिसांनी काल, 27 जूनच्या सायंकाळी केला. मदारटेकडी, सालीपुरा आणि संत ज्ञानेश्वरनगरात या कारवाया करण्यात आल्या. तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईने अवैधरित्या वाहनांत घरगुती गॅस भरून देणाऱ्या आणि घेणाऱ्यांत खळबळ उडाली आहे. …
 
खळबळजनक… घरगुती गॅस वाहनांत भरून देणारे मलकापूरमध्ये उघडले अवैध पंप!; पोलिसांच्‍या छापेमारीत सहा जणांना पकडले!!

मलकापूर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः घरगुती गॅस वाहनांत भरून देण्याचा गोरखधंदा काहींनी मलकापूरमध्ये सुरू केला असून, त्‍याचा पर्दाफाश मलकापूर शहर पोलिसांनी काल, 27 जूनच्‍या सायंकाळी केला. मदारटेकडी, सालीपुरा आणि संत ज्ञानेश्वरनगरात या कारवाया करण्यात आल्या. तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईने अवैधरित्‍या वाहनांत घरगुती गॅस भरून देणाऱ्या आणि घेणाऱ्यांत खळबळ उडाली आहे. मात्र या आरोपींना एवढ्या मोठ्या प्रमाणावर गॅस सिलिंडर्स उपलब्‍ध कसे होत होते, हेही कोडेच आहे. या गोरखधंद्यात कुणी एजन्सीधारकही सहभागी आहे का, या दृष्टीने तपास होण्याची गरज आहे.

तिन्‍ही आरोपी त्‍यांच्‍या घरी घरगुती गॅस वाहनांत भरून द्यायचे. मदारटेकडी येथील छाप्यात शाकीर खान सिकंदर खान (35, रा. मुश्ताकअलीनगर, मदारटेकडी मलकापूर) याच्‍या घरी, त्‍याचा नोकर प्रकाश दादाराव अढाव (38, रा. रोहिदासनगर, मलकापूर) ऑटोमध्ये (क्र MH 28 T 1407) घरगुती गॅस भरत होता. शाकीर खानसह प्रकाश अढाव आणि ऑटोमालक शेख शाकीर शेख आरीफ (21, रा. कुरेशीनगर, मलकापूर) या तिघांना ताब्‍यात घेण्यात आले. त्‍यांच्‍याकडून 26200 रुपयांचे गॅस भरण्याचे साहित्‍य व सव्वा लाखाचा ऑटो असा एकूण 1 लाख 51 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या घटनेचा तपास पोलीस उपनिरिक्षक श्री. माळी करत आहेत.

दुसऱ्या कारवाई शेरसिंह ऊर्फ शेरू घनश्यामसिंह राजपूत याच्‍या सालीपुरा (हनुमान मंदिराजवळ) येथील घरी करण्यात आली. तो सुद्धा घरगुती गॅस वाहनांत भरत होता. त्‍याच्‍या ताब्‍यातून 36200 रुपयांचे साहित्‍य जप्‍त करण्यात आले. या घटनेचा तपास पोलीस उपनिरिक्षक छाया वाघ करत आहेत.

तिसरी कारवाई संत ज्ञानेश्वरनगरात करण्यात आली. संतोष हरीभाऊ वाघ (43, रा. संत ज्ञानेश्वरनगर, मलकापूर) हा ऑटोमध्ये (क्र. एमएच 28 एच 5652) घरगुती गॅस काँप्रेसर नळीव्दारे भरत होता. नंदकिशोर गणपतलाल सोने (55, रा. लखान्नी चौक, मलकापूर) याचा हा ऑटो आहे. तोही घटनास्‍थळीच मिळून आला. पोलिसांनी सिलिंडर्ससह गॅस भरण्याचे 32 हजार रुपयांचे साहित्‍य आणि 1 लाखाचा ऑटो जप्‍त केला आहे. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरिक्षक म्हसाये करत आहेत. मानवी जीवनास धोका निर्माण होईल अशा रितीने हा गोरखधंदा सुरू होता. विनापरवाना गॅस सिलिंडर्सचा अवैध साठाही या तिन्‍ही आरोपींकडे मिळून आला आहे.