खरेदी करायला आल्या अन् चलाखीने साड्या लांबवल्या… बुलडाण्याच्या पंजाब कलेक्शनमधील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घरफोड्या कमी होत्या की काय म्हणून आता थेट दुकानात शिरून चलाखीने चोरी करण्याचा प्रकार बुलडाणा शहरात समोर आला आहे. जनता चौकातील पंजाब कलेक्शनमध्ये खरेदीच्या बहाण्याने आलेल्या महिलांनी तब्बल 50 ते 60 हजार रुपयांच्या साड्या लंपास केल्या. सीसीटीव्हीत ही घटना कैद झाल्याने महिलांचा हा कारनामा समोर आला. याच महिलांनी चिखली शहरातूनही …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घरफोड्या कमी होत्या की काय म्हणून आता थेट दुकानात शिरून चलाखीने चोरी करण्याचा प्रकार बुलडाणा शहरात समोर आला आहे. जनता चौकातील पंजाब कलेक्शनमध्ये खरेदीच्या बहाण्याने आलेल्या महिलांनी तब्बल 50 ते 60 हजार रुपयांच्या साड्या लंपास केल्या. सीसीटीव्हीत ही घटना कैद झाल्याने महिलांचा हा कारनामा समोर आला. याच महिलांनी चिखली शहरातूनही एका दुकानात अशाच प्रकार चोरी केल्याचे दुकानदार श्री. कृष्णा खुराणा यांनी सांगितले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.