केसापूरमध्ये रंगला होता जुगार, LCB च्‍या छाप्याने भागम्‌भाग!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एकीकडे गावागावात पेरणीच्या कामामुळे शुकशुकाट आहे. त्याच वेळी काही रिकामटेकडे मात्र पेरणीच्या दिवसांतही जुगार खेळत आहेत. केसापूर (ता. बुलडाणा) येथील अशाच एका जुगार अड्ड्यावर बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) आज, 25 जूनला दुपारी छापा मारला. या वेळी 7 जणांना पकडले. त्यांच्याकडून 95 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. एलसीबीचा छापा …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः एकीकडे गावागावात पेरणीच्या कामामुळे शुकशुकाट आहे. त्याच वेळी काही रिकामटेकडे मात्र पेरणीच्या दिवसांतही जुगार खेळत आहेत. केसापूर (ता. बुलडाणा) येथील अशाच एका जुगार अड्ड्यावर बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेने (एलसीबी) आज, 25 जूनला दुपारी छापा मारला. या वेळी 7 जणांना पकडले. त्यांच्याकडून 95 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. एलसीबीचा छापा पडताच जुगाऱ्यांची एकच भागम्‌भाग सुरू झाली. पण पोलिसांनी पळण्याची फारशी संधी दिली नाही.

14 हजार 560 रुपये रोख, चार मोटारसायकली (किंमत 65 हजार), पाच मोबाईल (किंमत 16 हजार) असा 95 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रशांत सुनील चव्हाण, उद्धव बळीराम चव्हाण, मधुकर नारायण उजगीरे, बळीराम रामराव चव्हाण, रमेश एकनाथ चव्हाण, अनिल रंगनाथ बिल्लारी (सर्व रा. केसापूर, ता. बुलडाणा), गणेश किसन शिंदे (रा. माळवंडी, ता. बुलडाणा) अशा 7 आरोपींना अटक करण्यात आली. ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली “एलसीबी’चे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक नीलेश शेळके, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, पोहेकाँ प्रकाश राठोड, युवराज मुळे, विजय सोनोने, गजानन गोरले, भारत जंगले, संजय भुजबळ, शिवानंद मुंढे यांनी केली.