कुटुंबासह बहिणीकडे गेले, परत येऊन पाहतात तर….; बुलडाण्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरातील मुठ्ठे लेआऊटमधील कुटुंबाला शेगावला बहिणीकडे जाणे चांगलेच महागात पडले. चोरट्यांनी त्यांचे घर लुटून नेले. सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा ९२ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. ही घटना २१ जूनच्या सायंकाळी समोर आली. शोएब अहमद खाल वल्द (३४, रा. मुठ्ठे ले आऊट) हे २० जूनला सकाळी ११ वाजता शेगाव …
 
कुटुंबासह बहिणीकडे गेले, परत येऊन पाहतात तर….; बुलडाण्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरातील मुठ्ठे लेआऊटमधील कुटुंबाला शेगावला बहिणीकडे जाणे चांगलेच महागात पडले. चोरट्यांनी त्‍यांचे घर लुटून नेले. सोन्‍याच्या दागिन्यांसह रोख रक्‍कम असा ९२ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. ही घटना २१ जूनच्‍या सायंकाळी समोर आली.

शोएब अहमद खाल वल्द (३४, रा. मुठ्ठे ले आऊट) हे २० जूनला सकाळी ११ वाजता शेगाव येथे कुटुंबासोबत त्यांची बहीण संबा अजूम यांच्याकडे गेले होते. २१ जूनला संध्याकाळी ७ वाजता घरी परत आले. घरासमोरील दरवाजाचे कुलूप तोडलेले त्‍यांना दिसले. त्‍यांनी घरात जाऊन पाहिले असता हॉलच्या बाजूच्या खोलीतील कपाट उघडे दिसले व सामान अस्ताव्यस्त दिसले.

कपाटातील सोन्याच्या तीन अंगठ्या प्रत्येकी ५ ग्रॅम वजनाच्या (किंमत अंदाजे ५२,५०० रुपये), सोन्याची अंगठी अंदाजे वजन ३ ग्रॅम (किंमत १०, ५०० रुपये), सोन्याची चैन अंदाजे वजन ८ ग्रॅम (किंमत २८००० हजार रुपये), नगदी १००० रुपये असा एकूण ९२ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्‍याचे त्‍यांना दिसून आले. त्‍यांनी काल, २२ जूनला चोरीची तक्रार बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करुन चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तपास पी. एस.आय. अमित जाधव करत आहेत.