कारने दुचाकीला उडवले; एक गंभीर, केळवद जवळील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भरधाव कारने दुचाकीला उडवले. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना आज, 26 जूनला सायंकाळी 5 च्या सुमारास बुलडाणा- चिखली रोडवरील केळवदजवळील हनुमान मंदिराजवळ घडली. घनश्याम सुरेश बंगाळे (40, रा. दरेगाव, ता. सिंदखेडराजा) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. घनश्याम बंगाळे हे त्यांच्या दवाखान्याच्या कामासाठी बुलडाणा येथे आले …
 
कारने दुचाकीला उडवले; एक गंभीर, केळवद जवळील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः भरधाव कारने दुचाकीला उडवले. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना आज, 26 जूनला सायंकाळी 5 च्या सुमारास बुलडाणा- चिखली रोडवरील केळवदजवळील हनुमान मंदिराजवळ घडली.

घनश्याम सुरेश बंगाळे (40, रा. दरेगाव, ता. सिंदखेडराजा) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. घनश्याम बंगाळे हे त्यांच्या दवाखान्याच्या कामासाठी बुलडाणा येथे आले होते. काम आटोपून परत जात असताना केळवदजवळील हनुमान मंदिराजवळ चिखलीकडून येणाऱ्या कारने (क्रमांक एमएच 22, यू 8047) त्यांना जबर धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या घनश्याम बंगाळे यांना नागरिकांनी तातडीने बुलडाणा जिल्हा रुग्णालयात हलवले. बुलडाण्यात प्राथमिक उपचार करून त्यांना औरंगाबाद येथे हलविल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.