कारच्या धडकेने दुचाकीस्वार ठार; खामगाव तालुक्यातील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कारने समोरून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील कोलोरी शिवारात (ता. खामगाव) 6 जानेवारीला दुपारी अडीचच्या सुमारास घडली. मंगेश जगदेव मोरे (रा. पंचशीलनगर, खरब रोड, अकोला) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांच्या मृतकाच्या भावाच्या तक्रारीवरून कारचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. मंगेश मोरे …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कारने समोरून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील कोलोरी शिवारात (ता. खामगाव) 6 जानेवारीला दुपारी अडीचच्या सुमारास घडली. मंगेश जगदेव मोरे (रा. पंचशीलनगर, खरब रोड, अकोला) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.

पोलिसांच्या मृतकाच्या भावाच्या तक्रारीवरून कारचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. मंगेश मोरे हा मोटारसायकलने (क्रमांक एमएच 30- बीएफ 3376) अकोला येथून खामगावला येत होता. कोलोरी शिवारात स्विफ्ट डिझायर कारने (क्र. एमएच 28, एझेड 3551) त्याला धडक दिली. यात मंगेश ठार झाला. मंगेशचा भाऊ नागेश याने खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास एएसआय शेख रब्बानी करत आहेत. गुन्हा पोहेकाँ शिवाजी दळवी यांनी दाखल करून घेतला.