एसबीआयसमोरून लांबवली मोटारसायकल!; खामगाव शहरातील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एसबीआयच्या मुख्य शाखेत कामानिमित्त आलेल्या ५० वर्षीय व्यक्तीची मोटारसायकलच चोरट्यांनी चोरून नेली आहे. ही घटना ५ ऑगस्टला दुपारी दोनच्या सुमारास घडली. या प्रकरणात काल, ८ ऑगस्टला खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आल्यानंतर पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विवेक मोरेश्वर पाठक (रा. सराफा, खामगाव) यांनी त्यांची …
 
एसबीआयसमोरून लांबवली मोटारसायकल!; खामगाव शहरातील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एसबीआयच्‍या मुख्य शाखेत कामानिमित्त आलेल्या ५० वर्षीय व्‍यक्‍तीची मोटारसायकलच चोरट्यांनी चोरून नेली आहे. ही घटना ५ ऑगस्‍टला दुपारी दोनच्‍या सुमारास घडली. या प्रकरणात काल, ८ ऑगस्‍टला खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आल्यानंतर पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. विवेक मोरेश्वर पाठक (रा. सराफा, खामगाव) यांनी त्यांची मोटारसायकल (क्र. MH 28 Y1103, किंमत दहा हजार रुपये) बँकेसमोर उभी केली होती. काम संपवून बाहेर आले असता दुचाकी दिसून आली नाही. त्यांनी परिसरात शोध घेतला. पण उपयोग झाला नाही. काल त्‍यांनी खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तपास नापोकाँ भानुदास तायडे करत आहेत.