“एसटी’ला चंदन! सहा महिन्यांपासून होती नजर

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरातील मलकापूर रोडवरील एस.टी. महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेच्या आवारातील चंदनाचे झाडच चोरट्यांनी कापून नेले. ही घटना आज, ६ ऑगस्टला सकाळी उघडकीस आली. झाडावर चोरटे आधीपासूनच नजर ठेवून होते. सहा महिन्यांपूर्वी या झाडाला ड्रिल मशिनद्वारे छिद्र करून गाभ्याची चाचपणी केली होती. रात्रीतून चोरट्याने हे झाड कापून नेले. याप्रकरणी एसटी महामंडळाचे विभागीय …
 
“एसटी’ला चंदन! सहा महिन्यांपासून होती नजर

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरातील मलकापूर रोडवरील एस.टी. महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेच्‍या आवारातील चंदनाचे झाडच चोरट्यांनी कापून नेले. ही घटना आज, ६ ऑगस्टला सकाळी उघडकीस आली. झाडावर चोरटे आधीपासूनच नजर ठेवून होते. सहा महिन्यांपूर्वी या झाडाला ड्रिल मशिनद्वारे छिद्र करून गाभ्याची चाचपणी केली होती. रात्रीतून चोरट्याने हे झाड कापून नेले. याप्रकरणी एसटी महामंडळाचे विभागीय यंत्र अभियंता स्वप्नील धनाड यांच्‍या वतीने एसटी महामंडळाच्या सुरक्षा विभागाने बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्‍यावरून चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.