एक मुका घेऊन गेला, दुसर्‍याने कपडे फाडले… अटाळीत विनयभंगाच्या दोन तक्रारी!

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव तालुक्यातील अटाळी येथे 2 जानेवारी रोजी विनयभंगाच्या दोन घटना समोर आल्या आहेत. खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गटांनी दिलेल्या तक्रारीवरून 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 35 वर्षीय विवाहिता शेतात एकटी असताना आरोपी विजय महादेव अंभोरे (रा. अटाळी) तिला तंबाखू मागण्यासाठी आला. तिने तंबाखू दिल्यानंतर …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव तालुक्यातील अटाळी येथे 2 जानेवारी रोजी विनयभंगाच्या दोन घटना समोर आल्या आहेत. खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गटांनी दिलेल्या तक्रारीवरून 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

35 वर्षीय विवाहिता शेतात एकटी असताना आरोपी विजय महादेव अंभोरे (रा. अटाळी) तिला तंबाखू मागण्यासाठी आला. तिने तंबाखू दिल्यानंतर विवाहिता शेतातील काम करू लागली तेव्हा आरोपीने तिला कवेत घेत तिच्या गालावर मुके घेतले. अचानक घडलेल्या घटनेने गोंधळलेल्या विवाहितेने आरोपीच्या हाताचा चावा घेतला आणि त्याला विळा मारल्यावर तो पळून गेला. विवाहितेने घडलेला प्रकार पतीला सांगितल्यावर पतीसह ती आरोपीच्या घरी गेली असता आरोपीच्या घरच्या लोकांनीही पती- पत्नीला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात विवाहितेच्या तक्रारीवरून विजय महादेव अंभोरे, महादेव अंभोरे, गजानन अंभोरे (सर्व रा. अटाळी, ता. खामगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दुसर्‍या गटानेही दिली विनयभंगाची तक्रार

याच घटनेतील दुसर्‍या गटानेही विनयभंगाची तक्रार दिली आहे. 55 वर्षीय महिलेच्या शेतात गजानन वामन काटोले याची गुरे शिरली. ती बाहेर का काढली, असे म्हणत गजानन वामन काटोले याची पत्नी व मुलीने फिर्यादी महिलेस मारहाण केली. गजानन काटोले यांनी 55 वर्षीय महिलेच्या अंगावरील कपडे फाडून विनयभंग केला. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गजानन वामन काटोले (रा. अटाळी ता. खामगाव) यांच्यासह त्याच्या पत्नी आणि मुलीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.