एक्का दे बादशाह दे… घरातच रंगलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांची अचानक रेड!; 17 जणांना पकडले!; 4 लाखांचा मुद्देमाल जप्‍त; मलकापूर शहरातील खळबळजनक कारवाई

बुलडाणा (मनोज सांगळे, मो. 9822988820, बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घरातच रंगलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी अचानक छापा मारला. रिंगण करून बसलेल्या तब्बल 17 जणांना पकडले. त्यांच्याकडून 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई मलकापूर शहर पोलिसांनी आज, 17 मे रोजी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास केली. बुलडाणा रोडवरील मधुबननगरातील अनिल दगडू इंगळे याच्या घरात पैशावर …
 

बुलडाणा (मनोज सांगळे, मो. 9822988820, बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः घरातच रंगलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी अचानक छापा मारला. रिंगण करून बसलेल्या तब्‍बल 17 जणांना पकडले. त्‍यांच्‍याकडून 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला आहे. ही कारवाई मलकापूर शहर पोलिसांनी आज, 17 मे रोजी दुपारी सव्वा बाराच्‍या सुमारास केली.

बुलडाणा रोडवरील मधुबननगरातील अनिल दगडू इंगळे याच्‍या घरात पैशावर जुगाराचा खेळ रंगल्याची माहिती पोलीस निरिक्षक प्रल्हाद काटकर यांना गुप्त बातमीदाराकडून कळाली. त्‍यांनी तातडीने पोलिसांचा मोठा ताफा घेऊन मधुबननगर गाठले. यात पोलीस उपनिरिक्षक छाया माधवराव वाघ, पोलीस उपनिरिक्षक संजिवनी पुंडगे, पोहेकाँ भगवान मुंढे यांच्‍यासह पोलीस कॉन्‍स्‍टेबल आणि आरसीपी पथकातील कर्मचाऱ्यांचा समावेश होता. साई कार केअरजवळ मोटार सायकली उभ्या करून त्‍यांनी अनिल इंगळेचे घर गाठले. दरवाजा अर्धवट बंद असल्याने दरवाजा लोटून पोलीस घरात आले जुगाऱ्यांना पत्ता नव्‍हता. अगदी सिनेस्‍टाईल पद्धतीने हा छापा मारला. कुणाला पळता आले नाही. खाली बसून गोल रिंगन करून एक्का दे बादशाह दे असे म्हणून हे सर्व मंडळी एक्का बादशाह नावाचा जुगार पैशाच्या हारजित खेळत होते.

सर्वांना जागीच पकडण्यात आले. पकडण्यात आलेल्यांत अनिल दगडू इंगळे (52, रा. भीमनगर, मलकापूर), गजानन धनराज जोगदंड (40,  रा. सावजीनगर, मलकापूर), योगेश रमेशचंद जैन (46, रा. हरिकिरण सोसायटी, मलकापूर), गोपाल पुरुषोत्तम राठी (44, रा.टेलिफोन कॉलनी, मलकापूर), सिध्दांत अनिल इंगळे (26, रा. भीमनगर मलकापूर), अनिल रामदास बगाडे (50, रा. माता महाकानीनगर, मलकापूर), आनंद पांडुरंग ठोसर (40, रा. बारादरी, मलकापूर), विजय उत्तम मेतकर (34, रा.संत ज्ञानेश्वरनगर मलकापूर), संदीप नारायण जामोदे (39, रा. काळीपुरा, मलकापूर), रमेश सुधाकर काकर (41, रा. देशपांडे गल्ली, मलकापूर), मुरलीधर अरुण गावंडे (41, रा. संतज्ञानेश्वरनगर, मलकापूर), नितीन शंकर रायपूरे (26, रा. संत ज्ञानेश्वरनगर, मलकापूर), गजानन हरिभाऊ काळे (49, रा. कुलमखेड मलकापूर), हुकुमचंद गुरुबस डंढोरे (51, रा. रामदेवनगर मलकापूर), अभिलाश मोहन तांदुळे (29, रा. गोपाळकृष्णनगर मलकापूर), बाबु तुळशिराम गावंडे (48, रा. मातामहाकालीनगर मलकापूर), निंबाजी शिवाजी कडुकार (44, रा. मातामहाकालीनगर मलकापूर) यांचा समावेश आहे. त्‍यांच्‍या झडतीत नगदी 1,00,330 रुपये व जुगार साहित्य (किंमत 50), 15 मोबाइल (किंमत अंदाजे 98,300) आणि 6 मोटारसायकली (किंमत अंदाजे 2,02,000) असा एकूण 4,00,680 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. तो पंचासमक्ष जप्त करण्यात आला. जुगाऱ्यांनी तोंडाला ना मास्क लावलेला होता, ना सुरक्षित अंतर ठेवले होते. तेही गुन्‍हे त्‍यांच्‍याविरुद्ध दाखल झाले आहेत.