उभ्या बैलाला मोटारसायकलची धडक; १ तरुण गंभीर तर दोघांना किरकोळ दुखापत; देऊळघाट जवळील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भरधाव दुचाकीने बैलाला दिलेल्या धडकेत एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला तर दोघांना किरकोळ दुखापत झाली. बैलाचा पायही फ्रॅक्चर झाला. ही घटना काल, १२ ऑगस्टच्या रात्री अकराच्या सुमारास बुलडाणा- अजिंठा मार्गावरील देऊळघाट येथील जिल्हा परिषद शाळेजवळ घडली. देऊळघाट येथील जिल्हा परिषद शाळेजवळ रस्त्याच्या बाजूला बैलगाडी उभी होती. ट्रिपल सीट असलेल्या दुचाकीस्वारांनी …
 
उभ्या बैलाला मोटारसायकलची धडक; १ तरुण गंभीर तर दोघांना किरकोळ दुखापत; देऊळघाट जवळील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भरधाव दुचाकीने बैलाला दिलेल्या धडकेत एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला तर दोघांना किरकोळ दुखापत झाली. बैलाचा पायही फ्रॅक्चर झाला. ही घटना काल, १२ ऑगस्टच्या रात्री अकराच्या सुमारास बुलडाणा- अजिंठा मार्गावरील देऊळघाट येथील जिल्हा परिषद शाळेजवळ घडली. देऊळघाट येथील जिल्हा परिषद शाळेजवळ रस्त्याच्या बाजूला बैलगाडी उभी होती. ट्रिपल सीट असलेल्या दुचाकीस्वारांनी बैलाला धडक दिल्याने तिघेही खाली पडले. यात सय्यद शाकिर सय्यद सफदर हा गंभीर जखमी झाला. शेख तन्वीर शेख हुसेन व शेख अल्ताफ शेख मुख्तार हे किरकोळ जखमी झाले. गंभीर जखमी शाकिर याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.