उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी पकडला 2 लाखांचा गुटखा; खामगाव शहरातील कारवाई

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घरात दडवून ठेवलेला दोन लाख रुपयांचा गुटखा खामगाव उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने पकडला. ही कारवाई काल, 16 जूनला सायंकाळी 7:30 च्या सुमारास खामगाव शहरातील लक्कडगंज भागात करण्यात आली. लक्कडगंज भागात राहणारा मनिष गुरूमुखदास अधीचा याने त्याच्या घरात प्रतिबंधित केलेला गुटखा साठवून ठेवला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पथकाने त्याच्या …
 
उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी पकडला 2 लाखांचा गुटखा; खामगाव शहरातील कारवाई

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः घरात दडवून ठेवलेला दोन लाख रुपयांचा गुटखा खामगाव उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने पकडला. ही कारवाई काल, 16 जूनला सायंकाळी 7:30 च्या सुमारास खामगाव शहरातील लक्कडगंज भागात करण्यात आली.

लक्कडगंज भागात राहणारा मनिष गुरूमुखदास अधीचा याने त्‍याच्या घरात प्रतिबंधित केलेला गुटखा साठवून ठेवला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पथकाने त्‍याच्‍या घरी छापा मारून घरझडती घेतली. तेव्‍हा 2 लाख 1 हजार 190 रुपयांचा गुटखा आढळला. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करत आरोपीविरोधात खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी, सहायक पोलीस निरिक्षक रवींद्र लांडे, एएसआय बद्रिनाथ जायभाये, मपोहेकाँ ज्योती धंदर, पो.ना. सुधाकर थोरात यांनी केली.