आज रात्री आणखी २८ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ९ एपीआय तर १९ पीएसआय बदलीवर!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील ठाणेदारांच्या बदल्या काल रात्री उशिरा केल्यानंतर आज, २४ ऑगस्टला कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी २९ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात ९ सहायक पोलीस निरीक्षक तर १९ पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. बदल्या केलेल्या १९ पोलीस उपनिरीक्षकांपैकी ११ जणांना पुढील सर्वसाधारण बदल्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. …
 
आज रात्री आणखी २८ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ९ एपीआय तर १९ पीएसआय बदलीवर!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील ठाणेदारांच्या बदल्या काल रात्री उशिरा केल्यानंतर आज, २४ ऑगस्‍टला कर्तव्‍यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी २९ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात ९ सहायक पोलीस निरीक्षक तर १९ पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. बदल्या केलेल्या १९ पोलीस उपनिरीक्षकांपैकी ११ जणांना पुढील सर्वसाधारण बदल्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

या सहायक पोलीस निरीक्षकांच्या झाल्या बदल्या…
बोराखेडी पोलीस ठाण्याचे राहुल जंजाळ यांना मुदतवाढ, शांतिकुमार रावसी पाटील यांना वाचक पो.अ. बुलडाणा येथून जिल्हा विशेष शाखा बुलडाणा येथे, कमलेश खंडारे यांना शेगाव शहर पोलीस ठाण्यातून शिवाजीनगर खामगाव येथे, राहुल जगदाळे यांना शिवाजीनगर येथून खामगाव शहर, नंदकुमार आयरे यांना बुलडाणा नियंत्रण कक्ष येथून मेहकर, अमोल बारापात्रे यांना बुलडाणा नियंत्रण कक्ष येथून चिखली, विजय मोरे यांना एलसीबी बुलडाणा येथून आर्थिक गुन्हे शाखा बुलडाणा, नंदकिशोर काळे यांना बुलडाणा शहर येथून शेगाव शहर येथे, सविता मोरे पाटील यांना बुलडाणा शहर पोलीस ठाण्यातून देऊळगाव राजा पोलीस स्टेशनमध्ये बदली देण्यात आली आहे.

११ पीएसआयना मुदतवाढ
गजानन देशमुख वाचक उपविभागीय पोलीस अधिकारी बुलडाणा, दिलीप जाधव वाचक उपविभागीय पोलीस अधिकारी खामगाव, दिगंबर अंभोरे आर्थिक गुन्हे शाखा, महेश भोसले वाचक उपविभागीय पोलीस अधिकारी देऊळगाव राजा, योगेंद्र मोरे रायपूर पोलीस ठाणे, रीना कोरडे महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक कक्ष, नामदेव तायडे पोलीस ठाणे मलकापूर ग्रामीण, योगेशकुमार दंदे पोलीस ठाणे शेगाव शहर, राहुल बोरकर एमआयडीसी मलकापूर ठाणे, सचिन चव्हाण पोलीस ठाणे चिखली, सचिन वाकडे पोलीस ठाणे जळगाव जामोद या अधिकाऱ्यांना पुढील सर्वसाधारण बदल्यांपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

८ पीएसआय अधिकाऱ्यांच्या बदल्या
किशोर घोडेस्वार यांची नांदुरा येथून जळगाव जामोद, बबन रामपुरे यांची बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यातून नियंत्रण कक्ष बुलडाणा, पांडुरंग शिंदे यांची चिखली पोलीस ठाण्यातून अमडापूर, दिनेश शिरेकर वाचक अप्पर पोलीस अधीक्षक बुलडाणा येथून पोलीस स्टेशन बुलडाणा ग्रामीण, मोहन गिते यांची नियंत्रण कक्ष बुलडाणा येथून पोलीस स्टेशन धाड येथे, वैभव पराते नियंत्रण कक्ष बुलडाणा येथून सायबर पोलीस स्टेशन बुलडाणा येथे, प्रवीण सोनवणे यांची पोलीस स्टेशन अमडापूर येथून वाचक अप्पर पोलीस अधीक्षक बुलडाणा येथे बदली करण्यात आली आहे.