अपघाताचे निशाण घेऊन व्यक्‍ती जिल्हा रुग्‍णालयात दाखल, कोण आहे, कुठला आहे… तुम्‍ही ओळखत असलात संपर्क करा…

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अनोळखी व्यक्तीला बुलडाणा येथील जिल्हा रुग्णालयात काल, २७ जुलैला रात्री भरती करण्यात आले आहे. या व्यक्तीचे वय अंदाजे ५० ते ६० वर्षे आहे. रुग्णासोबत कुणीही नातेवाइक नाही. त्याला स्वतःची ओळखही सांगता येत नाही. त्याचा अपघात झाला असून, मेहकरवरून त्याला बुलडाणा येथे आणण्यात आले आहे. त्याची ओळख पटलेली नसून, कुणी त्याला …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अनोळखी व्यक्तीला बुलडाणा येथील जिल्हा रुग्णालयात काल, २७ जुलैला रात्री भरती करण्यात आले आहे. या व्यक्तीचे वय अंदाजे ५० ते ६० वर्षे आहे. रुग्णासोबत कुणीही नातेवाइक नाही. त्याला स्वतःची ओळखही सांगता येत नाही. त्याचा अपघात झाला असून, मेहकरवरून त्याला बुलडाणा येथे आणण्यात आले आहे. त्‍याची ओळख पटलेली नसून, कुणी त्‍याला ओळखत असल्यास जिल्हा रुग्‍णालयातील पोलीस चौकीत संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.