अज्ञात वाहनाच्‍या धडकेने दुचाकीस्वार ठार; अमडापूर-चिखली मार्गावरील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अज्ञात वाहनाने उडवल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल, 26 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता अमडापूर- चिखली रस्त्यावर महिमळ शिवारात घडली. विलास सुधाकर काकडे (38, रा. बोरगाव काकडे, ता. चिखली) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते त्यांच्या दुचाकीने चिखलीकडे जात असताना महिमळ शिवारातील विजय होगे यांच्या शेताजवळ …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अज्ञात वाहनाने उडवल्‍याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल, 26 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता अमडापूर- चिखली रस्त्यावर महिमळ शिवारात घडली.

विलास सुधाकर काकडे (38, रा. बोरगाव काकडे, ता. चिखली) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते त्यांच्या दुचाकीने चिखलीकडे जात असताना महिमळ शिवारातील विजय होगे यांच्या शेताजवळ अज्ञात वाहनाने त्यांना जबर धडक दिली. या धडकेत विलास काकड यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अमडापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.