साप चावल्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्‍यू; मेहकर तालुक्‍यातील घटना

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पावसाळा सुरू झाल्यापासून सर्पदंशाच्या घटना वाढल्या आहेत. आज, १३ जुलैला दुपारी मोहना बुद्रूक (ता. मेहकर) येथे योगेश सखाराम करे पाटील (३६) या शेतकऱ्याचा साप चावल्याने मृत्यू झाला. योगेश करे हे सकाळी त्यांच्या शेतात गेले होते. शेतात काम करत असताना त्यांना विषारी सापाने चावा घेतला. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना उपचारासाठी अकोला …
 

मेहकर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पावसाळा सुरू झाल्यापासून सर्पदंशाच्या घटना वाढल्‍या आहेत. आज, १३ जुलैला दुपारी मोहना बुद्रूक (ता. मेहकर) येथे योगेश सखाराम करे पाटील (३६) या शेतकऱ्याचा साप चावल्याने मृत्‍यू झाला. योगेश करे हे सकाळी त्यांच्या शेतात गेले होते. शेतात काम करत असताना त्यांना विषारी सापाने चावा घेतला. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना उपचारासाठी अकोला येथे नेत असतानाच बाळापूरजवळ त्यांचा मृत्यू झाला. त्‍यांच्याकडे पाच एकर शेती असून, त्यांना पत्नी आणि दोन लहान मुले आहेत. त्‍यांच्या अकाली निधनाने मोहना बुद्रूक गावावर शोककळा पसरली आहे.