शेतीचे साहित्य घेऊन परतणाऱ्या शेतकऱ्याला उडवले; जागीच ठार, खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना १२ जुलैच्या रात्री दहाच्या सुमारास अकोला – खामगाव मार्गावरील मोठ्या हनुमान मंदिराजवळ घडली. खामगाव तालुक्यातील नागापूर येथील नारायण ज्ञानदेव तिव्हाने (४६) हे १२ जुलै रोजी शेतीचे साहित्य घेण्यासाठी दुचाकीने खामगाव येथे आले होते. रात्री काम आटोपून रात्रीच्या सुमारास दुचाकीने (क्र. …
 
शेतीचे साहित्य घेऊन परतणाऱ्या शेतकऱ्याला उडवले; जागीच ठार, खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना १२ जुलैच्‍या रात्री दहाच्या सुमारास अकोला – खामगाव मार्गावरील मोठ्या हनुमान मंदिराजवळ घडली.

खामगाव तालुक्यातील नागापूर येथील नारायण ज्ञानदेव तिव्हाने (४६) हे १२ जुलै रोजी शेतीचे साहित्य घेण्यासाठी दुचाकीने खामगाव येथे आले होते. रात्री काम आटोपून रात्रीच्या सुमारास दुचाकीने (क्र. एमएच 28 यू 2848) परत जात असताना खामगाव- अकोला मार्गावरील मोठ्या हनुमान मंदिराजवळ भरधाव अज्ञात वाहनाने त्‍यांना उडवले. यात तिव्हाने यांच्या डोक्याला मार लागुन त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे पोहेकाँ गजानन जोशी यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. रामेश्वर तिव्हाने यांच्या तक्रारी वरून शहर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.