राजकीय चिथावणीचे साईड इफेक्‍ट… माजी सैनिकाच्‍या तक्रारीवरून सात जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्‍हा दाखल!

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिथावणी, भडकावण्यामुळे राजकारण्यांचे भलेही राजकारण होत असेल मात्र याचा गाव पातळीवर मोठा परिणाम दिसून येत असतो. गौढाळा (ता. मेहकर) येथे १२ मे रोजी शेतीच्या वादातून झालेल्या हाणामारी प्रकरणी आता सात जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारीतील आरोप पाहता “ॲट्रॉसिटी-दरोड्याचे गुन्हे’ याबद्दल जी चिथावणी झाली, अगदीच तसाच काहीसा घटनाक्रम समोर …
 

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिथावणी, भडकावण्यामुळे राजकारण्यांचे भलेही राजकारण होत असेल मात्र याचा गाव पातळीवर मोठा परिणाम दिसून येत असतो. गौढाळा (ता. मेहकर) येथे १२ मे रोजी शेतीच्‍या वादातून झालेल्या हाणामारी प्रकरणी आता सात जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्‍हा दाखल झाला आहे. तक्रारीतील आरोप पाहता “ॲट्रॉसिटी-दरोड्याचे गुन्‍हे’ याबद्दल जी चिथावणी झाली, अगदीच तसाच काहीसा घटनाक्रम समोर येत आहे.

ज्ञानेश्वर कुंडलिक जाधव (५०) या माजी सैनिकाने पोलिसांत या प्रकरणी तक्रार केली आहे. न्‍यायप्रविष्ठ प्रकरणातील शेतीत ट्रॅक्‍टर चालविण्यास विरोध केला म्‍हणून त्‍यांना मारहाण आणि जातीवाचक शिविगाळ झाल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले आहे. विजय दयानंद धोडगे (४०), संदीप दयानंद धोडगे (३५), प्रभाकर मारोती धोडगे (४०), गजानन मारोती धोंडगे (३०), काशीराम नारायण निकम (५५), अरुण भुंजगराव निकस (३०), सचिन उत्तमराव कुटे (३५, सर्व रा. गौढाळा) अशी गुन्‍हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. मारहाण करताना हयगय करू नका. आपल्या पाठिशी राजकारणी भाऊ उभे आहेत. अॅट्रॉसिटी करण्याअगोदर याच्याविरुद्ध चोरीचा रिपोर्ट देऊ, असे संशयित म्हटल्याचे तक्रारीत जाधव यांनी म्‍हटले आहे. घटना १२ मेची असली तरी या प्रकरणात काल, ६ जुलैला तक्रार देण्यात आल्याने गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.