मेहकरमध्ये अवैध सावकारीचा गुन्‍हा

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अवैध सावकारीचा गुन्हा डोणगाव पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. व्याजासह पैसे परत करूनही सावकाराने शेतकऱ्याची १ हेक्टर २० आर जमीन परत केली नाही. त्यामुळे मेहकरच्या प्रभारी सहायक निबंधकांनी पुढाकार घेऊन पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावरून गजानन रामचंद्र गायकवाड (रा. राजपूत गल्ली वॉर्ड क्र. १५, दत्त मंदिराजवळ मेहकर) यांच्याविरुद्ध काल, २१ …
 
मेहकरमध्ये अवैध सावकारीचा गुन्‍हा

मेहकर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अवैध सावकारीचा गुन्‍हा डोणगाव पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. व्याजासह पैसे परत करूनही सावकाराने शेतकऱ्याची १ हेक्‍टर २० आर जमीन परत केली नाही. त्‍यामुळे मेहकरच्‍या प्रभारी सहायक निबंधकांनी पुढाकार घेऊन पोलिसांत तक्रार दाखल केली. त्‍यावरून गजानन रामचंद्र गायकवाड (रा. राजपूत गल्ली वॉर्ड क्र. १५, दत्त मंदिराजवळ मेहकर) यांच्‍याविरुद्ध काल, २१ जूनला रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज, २२ जूनच्‍या दुपारपर्यंतही आरोपीला अटक करण्यात आली नव्‍हती.

सखाराम शंकरराव काळदाते (रा. लोणीगवळी) यांनी आर्थिक अडचणीमुळे गजानन गायकवाड यांच्‍याकडून व्याजाने पैसे घेतले होते. यापोटी त्यांच्‍याकडील गट नं. २१० मधील १ हेक्टर २० आर जमीन आटकाव खरेदी करून आरोपीला दिली होती. मात्र पैशांची व्याजासह परतफेड करूनसुध्दा गायकवाड यांनी त्‍याला जमीन परत केली नाही. या प्रकरणाची तक्रार मेहकरच्‍या प्रभारी सहायक निबंधकांकडे शेतकऱ्याने केली होती. प्रकरणाची चौकशी करून, तसा अहवाल तयार करून प्रभारी सहायक निबंधक श्री. फाटे यांनी डोणगाव पोलिसांत तक्रार दाखल केली. त्‍यावरून पोलिसांनी गायकवाड यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला.