मध्यरात्री फिरत होता, पोलिसांना पाहून पळू लागला… झडतीत सापडले असे काही की लगेच पोलिसांनी ताब्‍यात घेतले!; शेगाव शहरातील घटना

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अंधाराचा फायदा घेऊन मोठी चोरी किंवा गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्यास पेट्रोलिंग करणाऱ्या शेगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे पेंचीस व पान्हा दिसून आला. ही कारवाई शेगाव शहरातील शिवनेरी चौकात काल, 4 जून रोजी पहाटे अडीचच्या सुमारास करण्यात आली. वसिम शहा रहीम शहा (24, रा. पेठ मोहोल्ला शेगाव) असे या संशयिताचे …
 

शेगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अंधाराचा फायदा घेऊन मोठी चोरी किंवा गुन्‍हा करण्याच्‍या उद्देशाने फिरणाऱ्यास पेट्रोलिंग करणाऱ्या शेगाव शहर पोलिसांनी ताब्‍यात घेतले. त्‍याच्‍याकडे पेंचीस व पान्हा दिसून आला. ही कारवाई शेगाव शहरातील शिवनेरी चौकात काल, 4 जून रोजी पहाटे अडीचच्‍या सुमारास करण्यात आली.

वसिम शहा रहीम शहा (24, रा. पेठ मोहोल्ला शेगाव) असे या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी आवाज दिला तेव्‍हा पळून जाण्याचा प्रयत्‍न करू लागला. मात्र पोलिसांनी शिताफीने पकडले. त्‍याच्‍याकडे पेंचिस, पान्‍हा आढळला. एवढ्या रात्री फिरण्याचे कारण विचारले असता त्‍याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्‍यामुळे त्‍याला ताब्‍यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्‍याच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे.