बुलडाण्यातील 37 बालकांच्या चेहर्‍यावर फुलले हास्य; मातृहृदयी महिला पोलीस कर्मचार्‍यांची कामगिरी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मुलगा, मुलगी घरातून अचानक बेपत्ता झाल्यावर कुटुंबियांची काय अवस्था होत असेल… काळजी, रडारड, चिंता अशा सार्या वातावरणात शोध घेण्यासाठी सुरू असलेली धडपड अगदीच काळीज पिळवटून टाकणारं दृश्य असतं. अशा घरापासून दुरावलेल्या 37 बालकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या आई- वडिलांच्या स्वाधीन करत बालकांच्या आणि परिवाराच्या चेहर्यावरही हास्य फुलविण्याचे काम बुलडाणा शहर …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मुलगा, मुलगी घरातून अचानक बेपत्ता झाल्यावर कुटुंबियांची काय अवस्था होत असेल… काळजी, रडारड, चिंता अशा सार्‍या वातावरणात शोध घेण्यासाठी सुरू असलेली धडपड अगदीच काळीज पिळवटून टाकणारं दृश्य असतं. अशा घरापासून दुरावलेल्या 37 बालकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या आई- वडिलांच्या स्वाधीन करत बालकांच्या आणि परिवाराच्या चेहर्‍यावरही हास्य फुलविण्याचे काम बुलडाणा शहर पोलिसांनी केले आहे.

10 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत ऑपरेशन मुस्कान मोहीम राबविण्यात आली. शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल कोकिळा तोमर, रामकला सुरभे, पोलीस कर्मचारी कौतिक बोर्डे यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली. गेल्या 20 दिवसांत शहरातल्या विविध भागांत भीक मागणारे, रस्त्याने बेवारस फिरणारे, तसेच मंदिर व बस स्थानक परिसरातील बालकांना पोलिसांनी आई-वडिलांकडे सोपविले.