बियाणे आणण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्याला कारने उडवले!; उपचाराला नेताना मृत्‍यू, सिंदखेड राजा तालुक्यातील घटना

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भरधाव कारने दुचाकीला उडवले. यात दुचाकीस्वार शेतकऱ्याचा उपचाराला नेत असताना मृत्यू झाला तर एक जण गंभीर झाला. ही घटना सिंदखेड राजा ते मेहकर रोडवरील पळसखेड चक्काजवळ (ता. सिंदखेड राजा) आज, 1 जुलै रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. रुस्तुम गोविंद म्हस्के (50, रा. महारखेड, ता. सिंदखेड राजा) …
 

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः भरधाव कारने दुचाकीला उडवले. यात दुचाकीस्वार शेतकऱ्याचा उपचाराला नेत असताना मृत्यू झाला तर एक जण गंभीर झाला. ही घटना सिंदखेड राजा ते मेहकर रोडवरील पळसखेड चक्काजवळ (ता. सिंदखेड राजा) आज, 1 जुलै रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. रुस्तुम गोविंद म्हस्के (50, रा. महारखेड, ता. सिंदखेड राजा) असे मृत्‍यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे, तर प्रल्हाद किसन जायभाये (40) हे गंभीर जखमी झाले आहेत.

रुस्तुम म्हस्के आज सकाळी गावातीलच प्रल्हाद जायभाये यांच्या दुचाकीवर बसून सोयाबीन बियाणे आणण्यासाठी किनगाव राजाकडे जात होते. सिंदखेडराजा ते मेहकर रोडवर पळसखेड चक्काजवळ त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या टोयोटा कारने (क्र. एमएच 28 एझेड 3274) जोरदार धडक दिली. यात म्‍हस्‍के गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचाराकरिता सिंदखेडराजा येथे हलविण्यात आले. प्राथमिक उपचार करून त्यांना जालना येथे रेफर करण्यात आले. जालना येथील संतकृपा हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी रुस्तुम म्हस्के यांना मृत घोषित केले. गंभीर जखमी प्रल्हाद जायभाये यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघात झाल्यानंतर कार चालक कार रस्त्यावर सोडून पसार झाला. याप्रकरणी सिंदखेडराजा पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.