बिग ब्रेकिंग ः धामणगाव बढेच्या तरुणीची बुलडाण्याच्या तुरुंगात आत्महत्या!; रायपूर पोलिसांनी घेतले होते ताब्यात

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बालसुधारगृहात दोन मुलांनी आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आज, 4 जानेवारीला सायंकाळी 7 वाजता तशाच स्वरुपाची धक्कादायक बातमी हाती आली आहे. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात कोरोनामुळे उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या जिल्हा कारागृहात 20 वर्षीय आरोपी महिलेने आत्महत्या केली आहे. रायपूर पोलीस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यात तिला ताब्यात घेण्यात आले होते. सध्या ती …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बालसुधारगृहात दोन मुलांनी आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आज, 4 जानेवारीला सायंकाळी 7 वाजता तशाच स्वरुपाची धक्कादायक बातमी हाती आली आहे. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात कोरोनामुळे उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या जिल्हा कारागृहात 20 वर्षीय आरोपी महिलेने आत्महत्या केली आहे. रायपूर पोलीस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यात तिला ताब्यात घेण्यात आले होते. सध्या ती न्यायालयीन कोठडीत होती, असे सूत्रांनी सांगितले.

अकियाबी मुनाब खाँ (20, रा. धामणगाव बढे) असे या घटस्फोटित महिलेचे नाव आहे. भादंवीचे 394,34 कलम तिच्याविरुद्ध रायपूर पोलीस ठाण्यात दाखल होते. जिल्हा कारागृहाच्या बाजूलाच असलेल्या ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या सिंहगड या इमारतीत तात्पुरते कारागृह बनवले असून, तिथे कोरोनामुळे आधी 14 दिवस आरोपींना ठेवण्यात येते. तिथेच अकियाबीला ठेवण्यात आले होते. सायंकाळी स्वच्छतागृहात जाऊन शॉवरला तिने ओढणी बांधली आणि आत्महत्या केल्याचे समोर आले. पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचले आहे. तिच्या आत्महत्येचे कारण रात्री दहापर्यंतही समोर आले नव्हते.