बालकामगाराच्‍या मृत्‍यूस कारणीभूत; प्राचार्या डॉ. सौ. सीमा लिंगायत, किशोरकुमार ढगे, अनिल मोरे यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल, शासकीय अध्यापक महाविद्यालयात घडली होती “ती’ घटना!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बालकामगार ठेवणे आणि त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिसांनी बुलडाणा येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. सीमा सुरेश लिंगायत, सम्यक नागरिक सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष किशोरकुमार मुरलीधर ढगे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती मागासवर्गीय सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेचे (केळवद) अध्यक्ष अनिल बाबुराव मोरे यांच्याविरुद्ध आज, ४ …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बालकामगार ठेवणे आणि त्‍याच्‍या मृत्‍यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिसांनी बुलडाणा येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्‍या प्राचार्या डॉ. सौ. सीमा सुरेश लिंगायत, सम्यक नागरिक सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष किशोरकुमार मुरलीधर ढगे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती मागासवर्गीय सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेचे (केळवद) अध्यक्ष अनिल बाबुराव मोरे यांच्‍याविरुद्ध आज, ४ ऑगस्‍टला गुन्‍हा दाखल केला आहे. गेल्या वर्षी ५ ऑगस्‍टला ही घटना घडली होती. पोलिसांनी तपास करून आज गुन्‍हे दाखल केले.

पोहेकाँ माधव पेटकर यांनी या प्रकरणात सरकार पक्षातर्फे तक्रार दिली. शेख शोहेब शेख कलिम (१७, रा.जोहरनगर बुलडाणा) या बालकामगाराचा मृत्‍यू शासकीय अध्यापक महाविद्यालयात शॉक लागून झाला होता. महाविद्यालयात साफसफाईचे काम करणारा शेख शोहेब शेख कलिम हा साफसफाईचे काम करत असताना त्यास लोखंडी गेटमधून आलेला करंट लागला. यातच त्‍याचा मृत्यू झाला आहे.

शेख शोहेब १८ वर्षांपेक्षा कमी असतानाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती मागासवर्गीय सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षांनी त्‍याला कामावर ठेवले. यापूर्वीदेखील सम्यक नागरिक सेवा सहकारी संस्थेच्‍या अध्यक्षाने त्‍याला कामावर ठेवल्याचे तपासात निष्पन झाले. महावितरण कंपनीकडूनही पोलिसांनी या प्रकरणी अहवाल मागवला होता. शासकीय अध्यापक महाविद्यालयातील असुरक्षित व धोकादायक वायरींग व अकार्यक्षम विज सुरक्षा प्रणालीमुळे हा प्रकार घडल्‍याचा अहवाल त्‍यांनी दिला. त्‍यावरून पोलिसांनी डाॅ. सौ. सीमा सुरेश लिंगायत, किशोरकुमार ढगे, अनिल मोरे यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक श्री. पाटील करत आहेत.