बापलेकाची करामत… शेतातच उघडला बनावट इंग्‍लिश दारूचा कारखाना!; पडल्या बेड्या!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतातील गोठ्यात सुरू केलेला बनावट इंग्लिश दारूचा कारखाना उद्ध्वस्त करून बापलेकांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी २८ जुलैच्या मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास संग्रामपूर शिवारात केली. बळीराम उखरडा बावस्कर (५०) व विशाल बळीराम बावस्कर (२५, रा. संग्रामपूर) अशी अटक करण्यात आलेल्या पिता- पुत्रांची नावे आहेत. मध्यप्रदेशातून दारू …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतातील गोठ्यात सुरू केलेला बनावट इंग्लिश दारूचा कारखाना उद्‌ध्वस्त करून बापलेकांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी २८ जुलैच्या मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास संग्रामपूर शिवारात केली. बळीराम उखरडा बावस्कर (५०) व विशाल बळीराम बावस्कर (२५, रा. संग्रामपूर) अशी अटक करण्यात आलेल्या पिता- पुत्रांची नावे आहेत.

मध्यप्रदेशातून दारू आणायची. तिचे नविनीकरण करायचे. बंद बाटलीत भरून बाटलीवर इंग्लिश दारू एमडीचे स्टिकर चिटकवायचे आणि एमडी या नावाखाली बनावट दारूची विक्री करायची. हा धंदा दोघे बापलेक काही दिवसांपासून करत होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना याची भणक लागताच काल आरोपींच्या शेतात उघडलेल्या कारखान्यावर छापा मारण्यात आला. त्यांच्याकडून ५० नग एमडी व्हिस्कीच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. दोघांवरही तामगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक श्री. गावंडे, श्री. मावळे यांच्या नेतृत्वात गणेश मोरे, अमोल सुसरे, प्रदीप देशमुख यांनी केली.