धाडच्या प्रतिष्ठित व्यापाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये मेहकरच्‍या व्यापाऱ्याचे नाव?

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः धाड येथील प्रतिष्ठित व्यापारी कुंडलिक जाधव यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. ही घटना काल, 22 मे रोजी सकाळी समोर आली होती. पोलीस तपासात कुंडलिक जाधव यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळली असून, त्यात मेहकरच्या एका व्यापाऱ्याचे नाव असल्याचे समोर येत आहे. मात्र याप्रकरणी धाड पोलिसांनी सध्या केवळ आकस्मिक मृत्यूची नोंद केली …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः धाड येथील प्रतिष्ठित व्यापारी कुंडलिक जाधव यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. ही घटना काल, 22 मे रोजी सकाळी समोर आली होती. पोलीस तपासात कुंडलिक जाधव यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळली असून, त्यात मेहकरच्या एका व्यापाऱ्याचे नाव असल्याचे समोर येत आहे. मात्र याप्रकरणी धाड पोलिसांनी सध्या केवळ आकस्मिक मृत्‍यूची नोंद केली असून, कुणाविरुद्धही गुन्‍हा दाखल केलेला नाही.

कुंडलिक देवराव जाधव (52, रा. धाड) यांचे धाडमध्ये शेतीउपयोगी अवजारे व साहित्य विक्रीचे दुकान आहे. ते पत्‍नी आणि दोन मुलांसह धाडमधील गजानननगरात राहत होते. त्यांनी 22 मे रोजी सकाळी राहत्या घरी छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळाल्यावर धाड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी तपासात जाधव यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. चिठ्ठीत मेहकर येथील एका व्यापाऱ्याला त्यांनी पाच लाख रुपयांचे थ्रेशर मशिन उधारीत दिले होते. पैशांची वारंवार मागणी करूनही त्‍या व्यापाऱ्याने जाधव यांचे पैसे दिले नाहीत. त्यामुळे आर्थिक संकट ओढावले. त्यामुळेच जाधव यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. धाड पोलीस ठाण्यात मेहकरच्या व्यापाऱ्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आज, 23 मेच्‍या रात्री नऊपर्यंतही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.