धक्‍कादायक! लॉकअपमध्ये असताना आरोपींनी बनवला ‘302’ च्‍या धमकीचा व्‍हिडिओ; आदल्‍या रात्री एकाला चाकूने वार करत लुटले होते…

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दुचाकीने घरी जाणाऱ्या तरुणाला अडवून चाकूचा दाखवत 18 हजार 700 रुपयांनी लुटल्याची घटना 16 फेब्रुवारीच्या रात्री सुंदरखेड येथील ग्रामपंचायत चौफुलीवर घडली होती. या प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. विशेष म्हणजे या तिघांनी लुटमारीचा व्हिडिओ बनवला होता. तरुणाला पोलिसांत गेल्यास ॲसिड टाकून जीवे मारण्याची धमकी देऊनही तक्रार दाखल झाल्याने अटकेनंतर …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः दुचाकीने घरी जाणाऱ्या तरुणाला अडवून चाकूचा दाखवत 18 हजार 700 रुपयांनी लुटल्याची घटना 16 फेब्रुवारीच्‍या रात्री सुंदरखेड येथील ग्रामपंचायत चौफुलीवर घडली होती. या प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्‍यात घेतले. विशेष म्‍हणजे या तिघांनी लुटमारीचा व्‍हिडिओ बनवला होता. तरुणाला पोलिसांत गेल्यास ॲसिड टाकून जीवे मारण्याची धमकी देऊनही तक्रार दाखल झाल्‍याने अटकेनंतर आरोपींनी लॉकअपमधून 302 च्‍या धमकीचा व्‍हिडिओ तयार केला. तो सोशल मीडियावर टाकून धमकावल्याचा धक्‍कादायक प्रकार आज, 18 फेब्रुवारीला समोर आला आहे. पोलिसांच्‍या ताब्‍यात असताना अशा प्रकारे व्‍हिडिओ बनवून आरोपींनी सोशल मीडियावर टाकल्याने सुरक्षा व्‍यवस्‍थेवरच प्रश्नचिन्‍ह निर्माण झाले आहे.

बुलडाणा शहरातील जोहरनगर येथील रहवासी शेख आकीब शेख आरिफ ( 24 ) हा 16 फेब्रुवारी रोजी चिखली रोडवरील एका खासगी रुग्णालयात रात्रपाळीच्या ड्युटीवर जात होता. महावितरणच्या कार्यालयासमोरील रस्त्यावर अमित सुनील बेंडवाल, प्रतीक बोर्डे व केतन तरवाडे या तिघांनी त्याची दुचाकी अडवून 50 रुपयांची मागणी केली. पैसे नसल्याचे सांगताच चाकूचा धाक दाखवून त्याच्या खिशातील 18 हजार 700 रुपये काढून तिघांनी काढून घेतले व अमित बेंडवाल याने त्याच्या छातीवर चाकू मारला. सर्वांनी लोटपाट करीत मारहाण केली. या घटनेचा मोबाइलमध्ये व्हिडिओ बनवून आरोपींनी सोशल मीडियावर टाकला. पोलिसात तक्रार दिली तर अंगावर ॲसिड टाकून जीवे मारून टाकू, अशी धमकी दिली .शेख आकीब शेख आरिफ याच्या तक्रारीवरून बुलडाणा शहर पोलिसांनी अमित सुनील बेंडवाल, प्रतीक बोर्डे व केतन तरवाडे या तिघांना अटक करून त्यांच्याविरुद्ध दाखल केले आहेत. विशेष रात्री 17 फेब्रुवारीच्‍या रात्री तिन्ही आरोपींचा पोलीस ठाण्यातील हातात हतकडी असलेला फोटो आणि त्यावर पोलीस प्रोटेक्टशन लिहून ‘अब तो सीधा 320’ असे स्टेटस आरोपीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून अपलोड करण्यात आला आहे. यातील आरोपी अमित बेंडवाल याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ अपलोड करण्यात आल्याने लॉकअपमध्ये असतानाही मोबाइल बाळगता येऊ शकतो का आणि अशा प्रकारे व्‍हिडिओ करून फिर्यादीला एकप्रकारे धमकावण्यात आल्याचे दिसून आल्याने अनेक प्रश्न उपस्‍थित झाले आहेत.