दीर-दीरानीने विवाहितेला विष पाजल्याचा आरोप!; मलकापूर शहरातील घटना

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मलकापूरच्या विषबाधित अत्यावस्थ महिलेवर बुलडाण्यातील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिला दीर-दीरानीने विष पाजल्याची तक्रार मलकापूर शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यावरून दीरास अटक करण्यात आली आहे. ही घटना मदारटेकडी भागात २३ जुलैला घडली. रिजवानबी अ.साबीर (२८) असे विष पाजलेल्या महिलेचे नाव आहे. दीर अ. सादीक व दीरानी शकीलाबी …
 

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मलकापूरच्‍या विषबाधित अत्‍यावस्‍थ महिलेवर बुलडाण्यातील जिल्हा रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत. तिला दीर-दीरानीने विष पाजल्याची तक्रार मलकापूर शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्‍यावरून दीरास अटक करण्यात आली आहे. ही घटना मदारटेकडी भागात २३ जुलैला घडली. रिजवानबी अ.साबीर (२८) असे विष पाजलेल्या महिलेचे नाव आहे. दीर अ. सादीक व दीरानी शकीलाबी अ. सादीक यांनी विष पाजल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक संजीवनी पुंडगे करत आहेत.