ट्रॅव्‍हल्सने पुण्याला निघालेल्या तरुणासोबत मध्येच घडली ‘विपरित’ घटना; कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, देऊळगाव राजा तालुक्‍यातील घटना

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पुण्याला निघालेला तरुण ट्रॅव्हल्स हॉटेलवर थांबल्याने उतरून लघुशंकेसाठी रस्ता ओलांडू लागला. त्याचवेळी भरधाव ट्रकने त्याला उडवले. यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात आयसीयूत उपचार सुरू आहेत. ही घटना 3 मेच्या मध्यरात्री बाराच्या सुमारास देऊळगावराजा – जालना रोडवरील भिवगावच्या समोरील हॉटेल गुरुकृपासमोर घडली. या प्रकरणी तरुणाच्या …
 

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पुण्याला निघालेला तरुण ट्रॅव्‍हल्स हॉटेलवर थांबल्याने उतरून लघुशंकेसाठी रस्‍ता ओलांडू लागला. त्‍याचवेळी भरधाव ट्रकने त्‍याला उडवले. यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्‍याच्‍यावर औरंगाबादच्‍या घाटी रुग्‍णालयात आयसीयूत उपचार सुरू आहेत. ही घटना 3 मेच्‍या मध्यरात्री बाराच्‍या सुमारास देऊळगावराजा – जालना रोडवरील भिवगावच्‍या समोरील हॉटेल गुरुकृपासमोर घडली. या प्रकरणी तरुणाच्‍या वडिलांनी आज दिलेल्या तक्रारीवरून देऊळगाव राजा पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

श्रावण शिवराम सोनोने (52) हे मलकापूरला पाटबंधारे विभागात चौकीदार आहेत. पत्‍नी सौ. शोभा, मुलगा मयूर व शुभमसह ते राहतात. त्‍यांची मुलगी शीतलचे लग्‍न झाले आहे. 3 मेच्‍या रात्री 7.30 वाजता त्‍यांचा मुलगा मयूर हा पुणे येथे कामानिमित्त जाण्यासाठी मलकापूर येथून ट्रॅव्हल्सने निघाला. मध्यरात्री झोपेत असताना 12.30 वाजेच्‍या सुमारास सोनोने यांना पोलिसांचा कॉल आला. त्‍यांनी सांगितले, की भिवगाव समोरील हॉटेल गुरुकृपासमोर ट्रॅव्‍हल्स थांबली असता मयूर लघुशंकेसाठी रस्‍ता ओलांडून जात होता. त्‍याचवेळी देऊळगावराजाकडून भरधाव आलेल्या ट्रकने (क्र CG.07 BF1235) त्‍याला उडवले. यात मयूर गंभीर जखमी झाला. सोनोने यांनी दुसरा मुलगा शुभमला मध्यरात्रीच 12.30 वाजता अपघातस्थळी देऊळगाव राजा येथे पाठविले. हॉटेलमालक ढाकणे व शुभमने मयूरला रुग्‍णवाहिकेने जालना येथे नेले. मात्र जालना येथील डॉक्टरांनी भरती करून न घेतल्याने त्‍याला औरंगाबाद येथील घाटी रुग्‍णालयात भरती करण्यात आले. सध्या मयूरची प्रकृती गंभीर असून, आयसीयूत त्‍याच्‍यावर उपचार सुरू आहेत. दिवसभर त्‍याच्‍याजवळ थांबून सोनोने यांनी मुलगा शुभम व जावई भरत त्रयंबक तायडे यास मयूरजवळ थांबवून आज  देऊळगाव राजा पोलीस ठाणे गाठले व ट्रकचालकाविरुद्ध तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी गुन्‍हा दाखल करून तपास सुरू केला आहे.