घराच्‍या गच्चीवर झोपताय? ‘ही’ न्‍यूज वाचा…; चोरटे करू शकतात तुमची बॅड मॉर्निंग!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा, मो. 9822988820) ः उकाड्याने त्रस्त होऊन घराच्या गच्चीवर झोपणाऱ्यांसाठी बॅड न्यूज आहे. ही बाब चोरट्यांच्या पथ्यावर पडत असून, गच्चीवर झोपलेल्यांचे चौथे घर चोरट्यांनी लक्ष्य केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गच्चीवर झोपताय पण सावधान असे म्हणण्याची वेळ आली आहे. धोडप (ता. चिखली) येथे गच्चीवर झोपायला गेलेल्यांची तीन घरे फोडल्यानंतर पिंपळगाव राजा (ता. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा, मो. 9822988820) ः उकाड्याने त्रस्‍त होऊन घराच्‍या गच्चीवर झोपणाऱ्यांसाठी बॅड न्‍यूज आहे. ही बाब चोरट्यांच्‍या पथ्यावर पडत असून, गच्चीवर झोपलेल्यांचे चौथे घर चोरट्यांनी लक्ष्य केल्‍याचे समोर आले आहे. त्‍यामुळे गच्चीवर झोपताय पण सावधान असे म्‍हणण्याची वेळ आली आहे. धोडप (ता. चिखली) येथे गच्‍चीवर झोपायला गेलेल्यांची तीन घरे फोडल्‍यानंतर पिंपळगाव राजा (ता. खामगाव) येथेही अशाच पद्धतीने घर फोडून चोरट्यांनी साडेचार लाख रुपयांच्‍या ऐवजावर डल्ला मारला आहे. ही घटना 19 मेच्‍या मध्यरात्री घडली.

श्रीरामनगरातील आठवडे बाजारात ज्ञानेश्वर श्रीराम वहिले राहतात. घराच्‍या गच्चीवर ते झोपलेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी त्‍यांचे घर फोडले. घरातील सामानाची नासधूस करत त्‍यांनी लॉकर शोधले. मात्र लॉकर त्‍यांना उघडता आले नाही. त्‍यामुळे त्‍यांनी गच्‍चीवर जाऊन झोपलेल्या वहिले यांच्‍या कुटुंबातील सदस्‍याच्‍या उशीखालील लॉकरची चावी काढून आणली. लॉकर उघडून त्‍यातील दागदागिने, वस्‍तू, रोख रक्‍कम असा साडेचार लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. वहिले कुटुंबातील राजेश वहिले हे श्रीराम संस्‍थानचे सचिव असून, त्‍यांनी श्रीराम मूर्तीचा मुकूट घरी आणून ठेवला होता. तोही चोरट्यांनी चोरून नेला. सकाळी घरात चोरी झाल्‍याचे समजताच ज्ञानेश्वर वहिले यांनी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलीस निरिक्षक सचिन चव्‍हाण, उपनिरिक्षक योगेश धोत्रे यांनी घटनास्‍थळी येऊन पाहणी केली. बुलडाण्यावरून श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. श्वानाने घटनास्‍थळावरून मुख्य रस्‍त्‍यावरील एका गल्लीपर्यंत धाव घेतली. मात्र नंतर ते घुटमळले.