खून अनैतिक संबंधातून!; रुम्‍हणा येथील शेतकऱ्याच्‍या मृतदेहाचे गूढ उकलतेय!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रुम्हणा (ता. सिंदखेड राजा) येथील शेतकऱ्याचा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे तपासात समोर येत आहे. साखरखेर्डा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांचा अन्य एक साथीदार फरारी आहे. 3 जून रोजी पैनगंगा नदीत पेनसावंगीजवळ (ता. चिखली) रंगनाथ तुकाराम खेडकर (53) या शेतकऱ्याचा मृतदेह हातपाय बांधलेला, पोटाला दगड बांधलेल्या अवस्थेत वाहून आला होता. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः रुम्‍हणा (ता. सिंदखेड राजा) येथील शेतकऱ्याचा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे तपासात समोर येत आहे. साखरखेर्डा पोलिसांनी दोघांना ताब्‍यात घेतले असून, त्‍यांचा अन्य एक साथीदार फरारी आहे.

3 जून रोजी पैनगंगा नदीत पेनसावंगीजवळ (ता. चिखली) रंगनाथ तुकाराम खेडकर (53) या शेतकऱ्याचा मृतदेह हातपाय बांधलेला, पोटाला दगड बांधलेल्‍या अवस्‍थेत वाहून आला होता. 31 मेपासून ते बेपत्ता होते. त्‍यांना तुमची पीक विम्याची कागदपत्रे कमी आहेत, असे कुणीतरी मोबाइलवर सांगून पांग्री उगले फाट्यावर बोलावले होते. ते हरवल्याची तक्रारही कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात दिली होती.

कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे. अमडापूर, किनगाव राजा व साखरखेर्डा पोलिसांनी समन्वयातून या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, यात त्‍यांना जाफराबाद येथून खुनाचे धागेदोरे हाती लागले. त्‍याआधारे त्‍यांनी जागदरी येथून दोघांना ताब्‍यात घेतले. त्‍यांच्‍या चौकशीतून अनैतिक संबंधातून हा खून झाल्‍याचे समोर येत आहे. तिसऱ्या आरोपीचा शोध सध्या युद्धपातळीवर घेतला जात आहे.