अवैध दारूची तक्रार करणाऱ्या महिलांवर हल्ला!; गावातील दहशतीमुळे कुणीच नाही धावले वाचवायला!!; पुन्‍हई येथील खळबळजनक घटना

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अवैध दारूविक्रीविरोधात पोलीस ठाण्यात निवेदन देणाऱ्या महिलांवर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुन्हई (ता. मोताळा) येथे काल, २७ जुलैला सकाळी आठच्या सुमारास घडली. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आकाश ईश्वर घोंगटे व क्रिष्णा ईश्वर घोंगटे अशी हल्लेखोरांची नावे आहेत. या प्रकरणी सौ.संगीता सुरेश इंगळे यांनी तक्रार …
 

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अवैध दारूविक्रीविरोधात पोलीस ठाण्यात निवेदन देणाऱ्या महिलांवर हल्ला करण्यात आल्याची धक्‍कादायक घटना पुन्‍हई (ता. मोताळा) येथे काल, २७ जुलैला सकाळी आठच्‍या सुमारास घडली. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

आकाश ईश्वर घोंगटे व क्रिष्णा ईश्वर घोंगटे अशी हल्लेखोरांची नावे आहेत. या प्रकरणी सौ.संगीता सुरेश इंगळे यांनी तक्रार दिली. तक्रारीत म्‍हटले आहे, की ईश्वर आणि क्रिष्णा हे गावात दारू विक्रीचा धंदा करत असतात. त्यामुळे गावातील महिलांनी त्यांच्‍यावर कारवाई व्‍हावी म्‍हणून २६ जुलैला बोराखेडी पोलीस ठाण्यात निवेदन दिले होते. ही बाब दोघांना कळल्‍याने त्‍यांनी काल, २७ जुलैला सकाळी सौ. संगितासह दर्शना शिंदे, शोभा सुरडकर नळावर पाणी भरत असताना दोघांनी शिविगाळ सुरू केली. तुम्ही आमच्याविरुध्द काल पोलीस स्टेशनला रिपोर्ट का दिला, असे म्‍हणून त्‍याने अश्लील शिविगाळ सुरू केली. पोलीस पाटील XXXX आहे. महिलांना समोर करतो. तुमच्‍याकडून आमचे काही वाकडे होत नाही, असे म्‍हणून धमक्‍या दिल्या. दोघांची गावात दहशत असल्याने कोणीही त्‍यांना रोखण्यास समोर आले नाही, असेही तक्रारीत म्‍हटले आहे. पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला असून, तपास महिला नायब पोलीस काँस्‍टेबल अनिता मोरे करत आहे.

गावात दारू विक्री मोठ्या प्रमाणावर, पोलीस येण्याआधीच कळते त्‍यांना वार्ता…
गावात अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असते. मात्र पोलीस कारवाईला येतात तेव्‍हा दारू लपवून शेतात आणि कुठेतरी लपवून ठेवण्यात येते. त्‍यामुळे पोलिसांच्‍या हाती काहीच लागत नाही, अशी चर्चा गावात आहे. गावात तरुण, अल्पवयीन मुलेही दारूच्‍या नशेत अडकली असल्याने दारू विक्रीला लगाम लावण्याची अपेक्षा व्‍यक्‍त केली जात आहे.