कोरोनाबळींची संख्या १६० वर, आजही महिलेचा मृत्यू; दिवसभरात जिल्ह्यात आढळले ४४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यात आज, १९ जानेवारीला आणखी एक कोरोना बळी गेला आहे. उपचारादरम्यान मलकापूरच्या वृंदावननगर येथील ७५ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ४४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, ३८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ३०६ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी २६२ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, ४४ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील ३८ व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील ६ अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील ११४ तर रॅपिड टेस्टमधील १४८ अहवालांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेले अहवाल
खामगाव शहर : ५, खामगाव तालुका : पळशी २, सुटाळा २, बुलडाणा शहर : १७, बुलडाणा तालुका : पाडळी १, शेगाव शहर : १, देऊळगाव राजा तालुका : सिनगाव जहागीर १, वाकड १, चिखली तालुका : सावरखेड १, भेराड १, चिखली शहर : २, नांदुरा तालुका : धाडी ४, मेहकर शहर : २, मोताळा शहर : २, मोताळा तालुका : वडगाव १, मलकापूर शहर : १
३८ रुग्णांची कोरोनावर मात
विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटरनुसार सुट्टी देण्यात आलेले रुग्ण असे : चिखली : ८, शेगाव : ९, मलकापूर : ३, बुलडाणा : अपंग विद्यालय १३, स्त्री रुग्णालय १, देऊळगाव राजा : १, मोताळा : ३.
३७० कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार
आजपर्यंत ९७५७० रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत १२८९५ कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच ८१८ स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण १३४२५ कोरोनाबाधित रुग्ण असून, जिल्ह्यात सध्या रुग्णालयात ३७० कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत १६० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.