कोरोना सुसाट! रुग्ण साडेचारशेच्या घरात!! 24 तासांत आढळले रेकॉर्डब्रेक 446
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः निर्बंध शिथिल होताच जिल्ह्यात कोरोना सुसाट अन् मोकाट सुटलाय! आज, 4 मार्चला रेकॉर्ड ब्रेक 446 पॉझिटिव्ह आढळल्याने कोविडचा धोका किती गंभीर आहे हे नव्याने सिद्ध झाले. त्यातही 7 तालुक्यांत थैमान दिसून आल्याने यंत्रणांची ‘दिल की धडकन तेज ‘ झाली आहे.
काल 2057 च नमुने संकलित झाले असले तरी मागिल काही पेंडिंग धरून 2739 अहवाल मिळाले. यातील तब्बल 446 जण बाधित आढळले. 2239 जण निगेटिव्ह असले तरी पॉझिटिव्हची संख्या धोक्याची घंटा समजली जात आहे. परिणामी बाधित होण्याचा दर 16 टक्केच्या वर गेलाय. सकाळी आरोग्य यंत्रणेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत बुलडाणा तालुक्यात 55, खामगाव तालुक्यात 66, शेगाव तालुक्यात 60, देऊळगाव राजा तालुक्यात 39, चिखली तालुक्यात 40, मेहकर तालुक्यात 7, मलकापूर तालुक्यात 43, नांदुरा तालुक्यात 48, लोणार तालुक्यात 1, मोताळा तालुक्यात 20, सिंदखेड राजा तालुक्यात 24, जळगाव जामोद तालुक्यात 20,
संग्रामपूर तालुक्यात 11, सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये 3, सहयोग हॉस्पिटलमध्ये 3 नवे पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत.
1122 जणांनी घेतली कोरोना लस
दरम्यान, काल, 3 मार्चला 1122 जणांनी कोरोनावरील लस कोव्हॅक्सिन घेतली. यात 45 ते 59 वयोगटातील 309 तर 60 वर्षांवरील 813 जणांचा समावेश आहे.