जरा सांभाळूनच भावा! तुझ्या लक्षात येईना "तिचा" कावा! फेसबुकवर व्हिडिओ कॉल करतांना व्हा सावध; चिखलीच्या विशालसोबत वाचा काय घडलं..

 
चिखली ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  तिचा "कावेबाजपणा" त्याच्या लक्षात आला नाही. फेसबुकवर मुलीच्या नावाने आलेली फ्रेंड रिक्वेस्ट त्याने लगेच एक्सेप्ट केली. दोघांमध्ये हाय हॅलो सुरू झाले..मुलगी आपल्याशी चॅटिंग करते म्हणून तो जरा हवेतच होता..चॅटिंग अगदी "आय लव्ह यू" पर्यंत पोहचली होती..एक दिवस तिने व्हिडिओ कॉल केला.. तो घरात एकटाच..ती निर्वस्त्र झाली..तिचा तो अवतार पाहून यानेही अंगावरील कपडे उतरवले..ती सांगेल तसे तो करत गेला..व्हिडिओ कॉल बंद झाला..तिचे त्याच्यावरील प्रेम पाहून तो तर अक्षरशः बेभान झाला...मात्र त्याची हवा लवकर उतरली..काही वेळाने त्याच्या व्हॉट्सॲप वर एक  व्हिडिओ आला..त्या व्हिडीओत तोच अश्लील चाळे करतांना दिसत होता तिचे मात्र तोंडही दिसत नव्हते..व्हिडिओ व्हायरल करायचा नसेल तर  पैशाची मागणी करण्यात आल्यावर त्याची प्रेमाची नशा एका झटक्यात उतरली..त्याच्या मित्रयादीतील अनेकांच्या फेसबुक मेसेंजरवर तो व्हिडिओ पाठविण्यात आला. चिखलीच्या पीडित विशालने (२१, नाव काल्पनिक) बुलडाणा लाइव्हला त्याच्यासोबत काय घडल ते सांगितलं..

बुलडाणा जिल्हा पोलीस दलाच्या सायबर शाखेने दिलेल्या माहितीनुसार या प्रकाराला सेक्सटॉर्शन अस म्हणतात. अनेक तरुण फेसबुकवर अनोळखी लोकांच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारतात. त्यांच्याशी चॅटिंग करतात. समोरची मुलगी असेल तर तरुणाला ती त्याची प्रेयसी असल्यासारखे वाटायला लागते. जीचा खरा चेहराही बघितला नाही तिच्या ते प्रेमात पडतात.अन् मग चिखलीच्या विशालसोबत जे घडल तसंच त्यांच्याही बाबतीत होत. मात्र बदनामीच्या भीतीपोटी अनेक तरुण हे सगळ सहन करतात. कर्ज काढून समोरच्याला पैसे पाठवतात पण पोलिसांत तक्रार देत नाहीत. अशा प्रसंगात पीडित व्यक्तीने वेळ न दवडता पोलीस ठाण्यात तक्रार केलीच पाहिजे. अशा प्रकरणात पीडित व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवल्या जाते. सायबर पोलीस अशा घटनांचा तपास करतात. मात्र तक्रार दिली नाही तर त्या व्यक्तीला वारंवार शोषणाला सामोरे जावे लागले. त्यामुळे अशा घटनांमध्ये पिडीतांनी पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे आवाहन सायबर पोलीस वारंवार करीत असतात.
  

ह्या गोष्टी टाळा                                                                                                                                                                                                                                                                          सोशल मीडियावर अनोळखी लोकांच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका. नवनवीन मित्र बनवण्याच्या मोहात कुणालाही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू नका. तुमच्या जीवनातील खाजगी बाबींचे प्रदर्शन सोशल मीडियावर करू नका.