जिल्ह्यात कोरोनाचे 4 बळी!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 22 मार्चला कोरोनाने 4 बळी घेतले असून, उपचारादरम्यान काँग्रेसनगर बुलडाणा येथील 70 वर्षीय पुरुष, शाहूनगर चिखली येथील 78 वर्षीय पुरुष, सावळा ता. मेहकर येथील 74 वर्षीय पुरुष, गोकुळधाम, मलकापूर येथील 67 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात 506 नव्या बाधितांची भर पडली असून, 594 रुग्णांनी कोरोनावर …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः  जिल्ह्यात आज, 22 मार्चला कोरोनाने 4 बळी घेतले असून, उपचारादरम्यान काँग्रेसनगर बुलडाणा येथील 70 वर्षीय पुरुष, शाहूनगर चिखली येथील 78 वर्षीय पुरुष, सावळा ता. मेहकर येथील 74 वर्षीय पुरुष, गोकुळधाम, मलकापूर येथील 67 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दरम्‍यान, दिवसभरात 506 नव्‍या बाधितांची भर पडली असून, 594 रुग्‍णांनी कोरोनावर मात केल्याने त्‍यांना रुग्‍णालयातून सुटी देण्यात आली आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1801 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1295 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 506 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील  384 व रॅपिड टेस्टमधील 122 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 565 तर रॅपिड टेस्टमधील 730 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल

बुलडाणा शहर : 35, बुलडाणा तालुका : देऊळघाट 1, धाड 2,  माळवंडी 2, माळविहिर 1,  येळगाव 1, जनुना 2, पाडळी 2, साखळी बुद्रूक 3, रायपूर 1, मासरुळ 1, हतेडी 1,  खामगाव शहर : 59,  खामगाव तालुका :  टेंभुर्णा 1, पिंपळगाव राजा 1, पळशी 2, सुटाळा 5, अंत्रज 1, ढेरपगाव 1, शेलोडी 1, विहिगाव 1, हिंगणा कारेगाव 2, गोंधनपूर 1,  नांदुरा तालुका :  खैरा 9, धानोरा 1, टाकळी 1,  मलकापूर शहर : 112, मलकापूर तालुका : दाताळा 2, भाडगणी 1, बेलाड 1, नरवेल 1, लासुरा 1, मोरखेड 1, निमखेड 1, आळंद 1, जांबुळ धाबा 1,  खामखेड 1,  चिखली शहर : 17,  चिखली तालुका : अमडापूर 2, मेरा बुद्रूक 3,  हातणी 2, पेनसावंगी 1, शेलूद 1, उंद्री 1, भरोसा 1, कोलारा 1, आंधाई 1, किन्ही सवडत 1, धोडप 1,  सिंदखेड राजा शहर : 7, सिंदखेड राजा तालुका : दुसरबीड 1, आडगाव राजा 1, वाघरी 1, पळसखेड चक्का 1, पिंपळगाव लेंडी 1, अंचली 2, उमरद 1, बेलोरा 1, साखरखेर्डा 21, बाळसमुद्र 2, गुंज 2, राहेरी 1, केशव शिवणी 1,  मोताळा तालुका :  खडकी 1, बोराखेडी 2, संगळाद 1, गुलभेली 2, पुन्हाई 1, लोन घाट 1, उबाळखेड 1, दाभा 1, घुस्सर 1, पिंपळगाव देवी 1,  मोताळा शहर : 5, शेगाव शहर : 34, शेगाव तालुका : माटरगाव 1, चिंचोली 2, शिरसगाव 1, पहूरजिरा 1, गौलखेड 1, तिव्हण 1,  संग्रामपूर तालुका : सोनाळा 1, वरवट खंडेराव 2,  जळगाव जामोद शहर : 8, जळगाव जामोद तालुका : आसलगाव 9, सावरगाव 9, वडोदा 1, जामोद 4, पळशी सुपो 5, मडाखेड 1, अकोला खुर्द 1, वडगाव 1,   देऊळगाव राजा शहर : 12, देऊळगाव राजा तालुका : अंढेरा 17,  देऊळगाव मही 1, सिनगाव जहाँगीर 1, जवळखेड 1, खल्याळ गव्हाण 1,  लोणार शहर : 3, लोणार तालुका :  बिबी 5, खंडाळा 1,  शारा 1, पांग्रा 1, देऊळगाव 1, पळसखेड 1,  मेहकर शहर : 2,  मेहकर तालुका :  हिवरा आश्रम 1, कळपविहीर 1, नायगाव 1, आंध्रूड 1, पोखरी 1, भालेगाव 1, नांदुरा शहर :6,  मूळ पत्ता पि. रेणुकाई 1, धावडा ता. भोकरदन 1, घणखेड ता. बोदवड 1, मंठा जि. जालना 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 506 रूग्ण आढळले आहेत.

594 रुग्‍णांनी केली कोरोनावर मात

आज 594 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः बुलडाणा : अपंग विद्यालय 58, कोविड हॉस्पिटल 11, मुलींचे वसतिगृह 32, सिद्धी विनायक हॉस्पिटल 6, सहयोग हॉस्पिटल 3,  खामगाव : 73, देऊळगाव राजा : 33,  चिखली : 36, मेहकर : 34, लोणार : 12,  जळगाव जामोद : 13, सिंदखेड राजा : 26, मलकापूर : 140, मोताळा : 6, शेगाव : 54, संग्रामपूर :4,  नांदुरा :43.

5365 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार  सुरू

आजपर्यंत 185290 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 25008 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 4145 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 30613 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या  रुग्णालयात 5365 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 240 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.