कोरोनाचे २ बळी! अजिसपूर, उमाळीच्या पुरुषाचा मृत्यू; दिवसभरात नवे 134 पॉझिटिव्ह रुग्ण
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कोरोनाने आज, 18 फेब्रुवारीला आणखी दोन बळी घेतले. उपचारादरम्यान अजिसपूर (ता. बुलडाणा) येथील 62 वर्षीय व उमाळी (ता. मलकापूर) येथील 84 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 134 नवे पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले असून, 66 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 649 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 515 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 134 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 103 व रॅपीड अँटिजेन टेस्टमधील 31 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 302 तर रॅपिड टेस्टमधील 213 अहवालांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेले अहवाल
मलकापूर शहर : 15, शेगाव शहर : 5, बुलडाणा शहर : 30, बुलडाणा तालुका : सागवण 2, नांद्राकोळी 1, सुंदरखेड 2, नांदुरा शहर : 1, जळगाव जामोद तालुका : अकोला खुर्द 1, झाडेगाव 1, वाडी खुर्द 1, आसलगाव 1, चिखली शहर : 30, चिखली तालुका : मंगरूळ नवघरे 1, अमडापूर 2, गजरखेड 1, पिंपळवाडी 1, खैरव 2, अंत्री कोळी 3, धोत्रा भणगोजी 2, तेल्हारा 2, देऊळगाव घुबे 1, सावरखेड 1, मोताळा शहर : 2, खामगाव शहर : 12, खामगाव तालुका : सुटाळा बु 1, घाणेगाव 1, देऊळगाव राजा शहर : 1, देऊळगाव राजा तालुका : भिवगण 1, सिनगाव जहागीर 1, अंढेरा 1, डोढ्रा 2, जांभोरा 1, सिंदखेड राजा शहर : 2, लोणार तालुका : सुलतानपूर 2, मूळ पत्ता माहोरा (ता. जाफराबाद जि. जालना) येथील 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 134 रुग्ण आढळले आहे.
66 रुग्णांनी केली कोरोनावर मात
आज 66 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. विविध तालुक्यांतील कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः बुलडाणा : सिद्धीविनायक कोविड हॉस्पीटल 27, स्त्री रुग्णालय 1, अपंग विद्यालय 4, नांदुरा : 4, खामगाव : 7, लोणार : 2, चिखली : 4, देऊळगाव राजा : 10, शेगाव : 2, मलकापूर : 3, सिंदखेड राजा : 2.
849 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत 116907 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 14329 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच 1455 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 15359 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्णालयात 849 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 181 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.