कोरोनाचा खामगावात एक बळी; नवे 41 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनामुळे जिल्ह्यात आज, 7 जानेवारीला उपचारादरम्यान खामगावच्या सजनपुरी भागातील 85 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात नवे 41 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले असून, 58 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 383 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 342 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 41 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 39 व रॅपिड अँटिजेन टेस्टमधील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 258 तर रॅपिड टेस्टमधील 84 अहवालांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर : 9, बुलडाणा तालुका : भादोला 1, मोताळा तालुका : बोराखेडी 1, चिखली शहर : 2, चिखली तालुका : चंदनपूर 1, चांधई 1, उंद्री 1, खामगाव तालुका : पारखेड 1, पिंपळगाव राजा 4, गोंधनपूर 1, खामगाव शहर : 8, मेहकर शहर : 1, देऊळगाव राजा शहर : 8, देऊळगाव राजा तालुका : बोराखेडी 2
58 रुग्णांनी केली कोरोनावर मात
आज 58 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. विविध तालुक्यांतील कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः मोताळा : 8, देऊळगाव राजा : 12, खामगाव : 13, शेगाव : 4, जळगाव जामोद : 2, चिखली : 5, संग्रामपूर : 1, बुलडाणा : स्त्री रुग्णालय 2, अपंग विद्यालय 2, मेहकर : 2, मलकापूर : 2, नांदुरा : 3.
340 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत 92625 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 12347 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच 840 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 12843 कोरोनाबाधित रुग्ण असून सध्या रुग्णालयांत 340 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 156 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकार्यांनी दिली आहे.